Advertisement

Ramdev Baba : पतंजलीला नोटीस, आयुष मंत्रालयानं उचललं 'हे' कडक पाऊल

कोरोनावर औषधं शोधल्याचा हा दावा (Ayurvedic medicine) केल्यानंतर आयुष मंत्रालयानं (Ministry of AYUSH)त्याची गंभीररित्या नोंद घेतली आहे.

Ramdev Baba : पतंजलीला नोटीस, आयुष मंत्रालयानं उचललं 'हे' कडक पाऊल
SHARES

कोरोनावर (Coronavirus) अनेक देश लस शोधत आहेत. पण आतापर्यंत कुणाला यश आलेलं नाही. पण मंगळवारी बाबा रामदेव (Ramdev Baba) यांनी पत्रकार परिषद घेत कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला. त्यांच्या दाव्यानं एकच खळबळ उडाली.

मोठ्या थाटात मंगळवारी कोरोनील (Coronil) हे औषध लाँच करण्यात आलं. यासंदर्भात अनेक दावे देखील बाबा रामदेव यांनी केले. याशिवाय पतंजलीनं यावर रिसर्च केला असून त्यांचा रिसर्च लवकरच जाहीर करतील असं त्यांनी परिषदेत स्पष्ट केलं.

मात्र, रामदेव बाबांनी कोरोनावर औषधं शोधल्याचा हा दावा (Ayurvedic medicine) केल्यानंतर आयुष मंत्रालयानं (Ministry of AYUSH)त्याची गंभीररित्या नोंद घेतली आहे. यासंदर्भात पतंजलीला नोटीस (Notice) देखील बजावण्यात आली आहे.

पतंजलीच्या (Patanjali) औषधांबद्दल आपल्यापर्यंत कोणतीही माहिती पोहोचली नसल्याचं आयुष मंत्रालयानं म्हटलं आहे. अशाप्रकारची औषधं शोधल्याचा दावा करण्याची जाहिरात (advertisements)करणं हे ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज म्हणजेच आक्षेपार्य जाहीरात (Drugs and Magic Remedies) १९५४ या कायद्याचा भंग आहे. तसंच, कोव्हिड-19 उद्रेकानंतर केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या नियमांचाही यातून भंग करण्यात आला आहे.

औषधांच्या निर्मितीचा दावा करणाऱ्या कंपनीला याबद्दल सूचित करण्यात आल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय. तसंच, संबंधित औषधांचं संशोधन कार्य तपासण्याबद्दल कंपनीला नोटीसही बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीकडून या औषधांची संपूर्ण माहिती, त्याबद्दलचं संशोधन, किती रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल घेण्यात आली त्याची संपूर्ण माहिती, CTRI नं याची काय नोंद केली आणि कोणत्या रुग्णालयात हे उपचार करण्यात आले यासंबंधीची सगळी माहिती आयुष मंत्रायानं मागवली आहे.

उत्तराखंडमध्ये या कंपनीची नोंद झाली असल्यानं त्यांनी कोव्हिड-19 वर आयुर्वेदीक औषध शोधण्यासाठी त्यांना कोणता परवाना दिला आहे, त्याची प्रतही मंत्रालयानं मागवून घेतली आहे.

कोरोनील लाँच केलं तेव्हा  पतंजली योगपीठाचे सरचिटणीस आणि योग शिक्षक बाबा रामदेव यांचे सहयोगी आचार्य बालकृष्ण म्हणाले होते की, यावेळी कोरोना विषाणू भयावह स्थितीत आहे. कोरोना विषाणूचा शोध लागला तेव्हापासूनच पतंजली संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या पथकानं त्याच्या औषधाचा शोध सुरू केला होता. तुळस, अश्वगंधा तसंच अनेक प्रकारच्या रसापासून त्यांनी हे औषध बनवले आहे. हे औषध हजारो कोरोना पॉझिटिव्ह लोकांवर वापरलं गेलं आहे. त्यांचा पाठपुरावा करण्यात आला असून ते सर्वजण बरे झाले आहेत.

औषध लाँच करताना रामदेव म्हणाले की, आज एलोपॅथिक सिस्टम मेडिसन पुढे आहे. आम्ही कोरोनिल बनवलं आहे. ज्याची २८० लोकांवर चाचणी केली. ३ दिवसांच्या आत ६५ टक्के रुग्ण बरे झाले. तर ७ दिवसात १०० टक्के लोक बरे झाले. आम्ही संपुर्ण रिसर्च करून हे औषध तयार केलं आहे. औषधाचा १०० टक्के रिकव्हरी रेट असून, शून्य टक्के मृत्यूदर आहे.हेही वाचा

Baba Ramdev: काळजी नको भावा! बाबा रामदेव करताहेत कोरोनावरील औषधाचा दावा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा