Advertisement

Ramdev baba : पतंजलीच्या कोरोनील औषधाबद्दल जाणून घ्या ‘या’ १३ गोष्टी

रामदेव बाबा यांनी पतंजलीचं कोरोनील हे औषध आज लाँच केलं. या औषधाबद्दल काही गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे. जाणून घ्या यासंदर्भातील अधिक माहिती...

Ramdev baba : पतंजलीच्या कोरोनील औषधाबद्दल जाणून घ्या ‘या’ १३ गोष्टी
SHARES

कोरोनावर सर्वच देश लस शोधत आहे. परंतु, पतंजलीनं (Patanjali)कोरोनावर आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केला आहे. बाबा रामदेव यांनी कोरोनावरील (Covid-19) औषधाची घोषणा पत्रकार परिषद घेत केली. अवघ्या सात दिवसात कोरोना रुग्णांचा रिपोर्ट नेगेटिव्ह येईल, असा दावा देखील पतंजलीनं केलं आहे. काही दिवसांमध्ये हे औषध बाजारात येईल, असंही बाबा रामदेव यांनी स्पष्ट केलं आहे.

रामदेव बाबा (Ramdev baba) यांनी पतंजलीचं कोरोनील हे औषध आज लाँच केलं.  बाजारात हे औषध आल्यास त्याला अधिक मागणी असू शकते. पण त्याआधी या औषधाबद्दल काही गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला या संदर्भातच काही माहिती देणार आहोत.

१) कोरोनील (Coronil) असं या औषधाचं नाव आहे. कोरोनावर प्रभावी असल्याचा दावा पतंजलीनं केला आहे. पण आयुष (Aaush) मंत्रालयानं कोरोनील संदर्भात कुठलीच माहिती नसल्याचं म्हटलं आहे. 

२) किट स्वरूपात हे औषध येते. एका किटमध्ये तीन प्रकारची औषधं आहेत. त्यात कोरोनील टॅबलेट, स्वसरी वटी आणि अनु आईल नावाचं एक तेल आहे.

३) पतंजलीनं केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, (Ayurvedic medicine) कोरोनिलमध्ये गिलोय, अश्‍वगंधा, तुलसी, श्‍वसारी रस आणि अणू तेलाचे  मिश्रण आहे. 

४) रामदेव म्हणाले की कोरोनिलमध्ये 100 पेक्षा जास्त औषधी घटकांचा वापर केला गेला आहे. संपूर्ण किट रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात मदत करेल.

५) औषधामध्ये असलेला अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सिन कनव्हर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतो, असंही रामदेव यांनी सांगितलं.

६) कोरोनिल औषध हे सकाळी आणि संध्याकाळी एकदा घ्यावं लागणार आहे. १५ ते ८० वयोगटातील लोकांसाठी औषधाचं हे प्रमाण योग्य आहे. पण ६ ते १४ वयोगटातील लोकांसाठी प्रौधांना देण्यात येणाऱ्या डोसपेक्षा अर्ध प्रमाण असावं.

७) कोरोनिल औषध तयार करण्यासाठी दोन प्रकारे उपचार केले गेले. क्लिनिकल कंट्रोल स्टडी आणि क्लिनिकल कंट्रोल ट्राय या पद्धतीचा वापर केला असल्याचं रामदेव यांनी सांगितलं.

८) क्लिनिकल कंट्रोल स्टडीसाठी दिल्ली, अहमदाबाद, मेरठसह देशातील इतर भागात अनेक रुग्णांवर प्रयोग केले. यात कोणत्याही रुग्णांचा मृत्यू झाला.

९) क्लिनिकल कंट्रोल ट्रायल करण्यासाठी सीटीआरची परवानगी घेण्यात आली होती. यामध्ये पंतजली रिसर्ज सेंटर आणि नॅशनल मेडिकल इन्स्टिट्युट सायन्स निम्स यांच्या संयुक्त विद्यमानानं १०० लोकांवर उपचार करण्यात आले.

१०) दोन्ही प्रकारे करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आलं की, १०० टक्के रुग्ण बरे होत आहेत. काही ३ दिवसात तर काही ७ दिवसात रुग्ण बरे होत आहेत. या स्टडी दरम्यान एकाचाही मृत्यू झाला नाही, असंही रामदेव बाबांनी दावा केला आहे.ट

११) काही दिवसांमध्ये औषधासाठी करण्यात आलेला रिसर्च जाहीर करण्यात येईल, असं पतंजलीकडून स्पष्ट केलं गेलं आहे.

१२) COVID 19 च्या उपचारावरील पतंजलीच्या औषधाची कार्यक्षमता अद्यापपर्यंत कोणत्याही स्वतंत्र वैद्यकीय मंडळाद्वारे तपासण्यात आली नाही.

१३) जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) अलीकडेच म्हटलं होतं की, अनेक औषधी चाचण्या सुरू असताना, COVID 19 ला कोणतंही औषध बरे करता किंवा रोखू शकतं याचा पुरावा अद्याप नाही.



हेही वाचा

Baba Ramdev: काळजी नको भावा! बाबा रामदेव करताहेत कोरोनावरील औषधाचा दावा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा