Advertisement

मुंबईतील 'या' भागात एका रुग्णामागं २० जणांचं विलगीकरण

मुंबईतील इतर भागात प्रत्येक रुग्णामागं १५ जणांचं विलगीकरण करण्यात येतं.

मुंबईतील 'या' भागात एका रुग्णामागं २० जणांचं विलगीकरण
SHARES

मुंबईतील हाॅटस्पाॅट ठरलेल्या धारावी आणि वरळीमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश आलं आहे. पण आता उत्तर मुंबई आणि पूर्व उपनगर हे कोरोनाचे नवे हाॅटस्पाॅट ठरत आहेत. दिवसेंदिवस येथील रुग्णसंख्या वाढतच आहे. मुंबईत वाढणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी निम्मे रुग्ण दिंडोशी, गोरेगाव, बोरिवली, दहिसर, मालाड, भांडुप, मुलुंड आदी भागातील आहेत. त्यामुळे येथील रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी या भागात प्रत्येक कोरोना रुग्णामागे २० जणांचं संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे. मुंबईतील इतर भागात प्रत्येक रुग्णामागं १५ जणांचं विलगीकरण करण्यात येतं.

उत्तर मुंबई आणि पूर्व उपनगरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पालिकेने नवीन अ‍ॅक्शन प्लॅन हाती घेतला आहे. मुंबईतील सहा विभागांमध्ये मिशन झिरो राबवण्यात येणार आहे. यानुसार दोन ते तीन आठवड्यात रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ५० फिरत्या दवाखान्यांची (मोबाइल व्हॅन) व्यवस्था करण्यात येणार आहे.

भांडुप , मुलुंड, बोरिवली, दहिसर, मालाड, कांदिवली या भागांचा मिशन झिरोमध्ये समावेश आहे. या सर्व परिसरातील रुग्णदुपटीचा कालावधी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी या मोबाइल व्हॅन) तेथे रुग्णांची तपासणी करणार आहेत.  तसंच कोरोना संशयित रुग्णांना त्वरीत वेगळे करुन त्यांची कोरोना चाचणी टेस्ट केली जाणार. मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी ३६ दिवसांवरुन ५० दिवसांवर नेण्याचं लक्ष्य पालिकेने ठेवलं आहे.हेही वाचा -

सोमवारी मुंबईत २० जणांचा मृत्यू; मृत्यूंची संख्या घटली

दारू पिण्याच्या परवानगीसाठी ‘इतक्या’ जणांनी केले अर्ज
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा