Advertisement

सोमवारी मुंबईत २० जणांचा मृत्यू; मृत्यूंची संख्या घटली

मागील २४ तासांत राज्यात एकूण ६२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी मुंबईत २० जणांचा मृत्यू; मृत्यूंची संख्या घटली
SHARES

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून मृतांचा आकडाही वाढतो आहे. परंतु, सोमवारी मुंबईतील मृत्यूंची संख्या लक्षणीय घटली आहे. मागील २४ तासांत राज्यात एकूण ६२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईतील २० जणांचा समावेश आहे. मुंबईतील मृतांचा एकूण आकडा ३ हजार ७३७ इतका आहे. राज्यात सोमवारी ३ हजार ७२१ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या एक लाख ३५ हजार ७९६ इतकी झाली आहे.

मुंबईत दररोज १ हजाराच्या दारात कोरोना रुग्ण आढळत आहेत. सोमवारी देखील १ हजार ९८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ५८६ इतकी झाली आहे. मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविणयासाठी मुंबई महापालिका शर्तीचे प्रयत्न करत आहे. मुंबईत ठिकठिकाणी विलगीकरण केंद्र, पालिकेच्या रुग्णालयात कोरोना वॉर्ड, सामान्यांना मास्क, सॅनिटायझर यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.


  • नवी मुंबई महापालिकेत १३७ नवे रुग्ण वाढले असून, बाधित रुग्णांचा एकूण आकडा ५ हजार ९२३ इतका आहे. सोमवारी एकही मृत्यूची नोंद झाली नसून, एकूण मृत्यू १६३ आहेत.
  • कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत २९९ नव्या रुग्णांची वाढ झाली असून, तेथे एकूण रुग्ण संख्या चार हजार ३२९ आहे. दिवसभरात एका मृत्यूची नोंद झाल्यामुळे कल्याण-डोंबिवली हद्दीत मृतांची संख्या ७२ झाली आहे.
  • वसई-विरार महापालिका हद्दीत १४७ नव्या रुग्णाची नोंद झाली असून, एकूण बाधित रुग्णांची संख्या २ हजार ९७० इतकी झाली आहे. वसई-विरारमध्ये एकही मृत्यू नसून, एकूण मृत्यू संख्या ८३ आहे.
  • ठाणे जिल्ह्यात नवे १४० रुग्ण वाढले असून, एकूण बाधित रुग्णांची संख्या २ हजार ८९० इतकी झाली आहे. तर ठाणे महापालिका हद्दीत नवे १६६ रुग्ण वाढले असून, एकूण रुग्णांची संख्या सात हजार ४७७ इतकी झाली.
  • ठाणे जिल्हा आणि ठाणे महापालिका हद्दीत सोमवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नसून, त्या दोन्ही ठिकाणच्या मृतांचा एकूण आकडा ५७ आणि २३७ असा आहे.



हेही वाचा -

मानखुर्द-घाटकोपर रोड येथील स्क्रॅप कंपाऊंडला भीषण आग

यंदा शाडू मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, मुंबईच्या राजाचा निर्णय



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा