Advertisement

यंदा शाडू मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, मुंबईच्या राजाचा निर्णय

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळानं यावर्षी फक्त पूजेची शाडू मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा शाडू मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, मुंबईच्या राजाचा निर्णय
SHARES

मुंबईत कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. या कोरोनामुळं मुंबईतील अनेक सणांवर संकट ओडावलं आहे. काही दिवसांवरच येऊन ठेपलेल्या दहिहंडी उत्सवावरही कोरोनाचं सावट आहे. मुंबईतील बड्या आयोजकांनी दहिहंडीचा उत्सव रद्द केला आहे. त्यामुळं गोविंदा पथकांमध्येही यंदा शांततेचं वातावरण असणार आहे. अशातच मुंबापुरीतील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव या गणेशोत्सवाच्या काळात १० दिवस गणेशभक्तांची मोठी गर्दी मंडळांमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी पाहायला मिळते. परंतु, यंदा कोरोनामुळं व सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या आवाहनानुसार, अनेक गणेशोत्सव मंडळांनी साध्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईचा राजा अशी ख्याती असलेल्या गणेशगल्लीच्या लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवास आता काही महिने उरले आहेत. पण यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनाचं सावट पाहता लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळानं यावर्षी फक्त पूजेची शाडू मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव गर्दीत वाढण्याची अधिक शक्यता असल्यामुळं भाविकांसाठी लाईव्ह दर्शन ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय, बाप्पाचं विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळानं याआधी देखील एक मोठा निर्णय घेतला होता. सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडलं आहे. अशा परिस्थितीत विभागीय वर्गणीदारांवर गणेशोत्सवाचा आर्थिक बोजा न टाकण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात वर्गणीदारांकडून वर्गणी न घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबईच्या राजातर्फे घेण्यात आला. फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती देण्यात आली होती.

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या या निर्णायचं सर्वत्र कौतुक होत आहे. लालबाग सार्वजनिक मंडळानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईच्या राजाच्या वतीनं ५ लाख निधीची मदत करण्यात आली.



हेही वाचा -

मानखुर्द-घाटकोपर रोड येथील स्क्रॅप कंपाऊंडला भीषण आग

दारू पिण्याच्या परवानगीसाठी ‘इतक्या’ जणांनी केले अर्ज



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा