Advertisement

मानखुर्द-घाटकोपर रोड येथील स्क्रॅप कंपाऊंडला भीषण आग


मानखुर्द-घाटकोपर रोड येथील स्क्रॅप कंपाऊंडला भीषण आग
SHARES

मुंबईतील मानखुर्दमधील मंडला परिसरातील झोपडपट्टीत भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही लागली आहे. मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडच्या शेजारी असणाऱ्या स्क्रॅप कंपाऊंडमध्ये आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच, आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.


मानखुर्दमध्ये असलेल्या स्क्रॅप कंपाऊंडला लागलेल्या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुरुवातीला ही आग लेव्हल-१ ची असल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली. मात्र त्यानंतर आगीनं रौद्र रुप धारण केलं. त्यानंतर ही आग लेव्हल-३ ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. स्क्रॅप करण्यात आलेल्या वस्तू आणि तेलाचे वापरलेले डबे आगीमध्ये जळून खाक झाले आहेत.

या भागात १५ हजार चौरस फूटांवर ५ स्क्रॅप गोडाऊन आहेत. वाऱ्याचा वेग अतिशय जास्त असल्यानं आग पसरण्याचा धोका आहे. त्यामुळं अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सध्या ३ फायर फायटिंग जेट्स घटनास्थळी आहेत. याशिवाय ६ फायर इंजिन, दोन फोम टेंडर, पाच जंबो टँकर, तीन वॉटर टँकर आणि एक रुग्णवाहिकादेखील घटनास्थळी पोहोचली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा