Advertisement

कोरोनामुक्त लोकांना आयुष्यभर उद्भवणार 'या' समस्या, अभ्यासातून माहिती उघड

कोरोनावर रिसर्च देखील करण्यात येत आहेत. त्यातून कोरोना संदर्भात अधिक माहिती समोर येत आहे.

कोरोनामुक्त लोकांना आयुष्यभर उद्भवणार 'या' समस्या, अभ्यासातून माहिती उघड
SHARES

जगभरात कोरोनानं थैमान घातला आहे. आतापर्यंत लाखो लोकांचा कोरोनानं जीव घेतला आहे. कोरोनावर अनेक देश लस शोधत आहेत. पण अद्याप कोरोनावर औषध सापडलं नाही. सध्या दुसऱ्या आजारावरील औषध देऊन रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढवली जात आहे. कोरोनावर रिसर्च देखील करण्यात येत आहेत. त्यातून कोरोना संदर्भात अधिक माहिती समोर येत आहे.

आता करण्यात आलेल्या एका दाव्यानुसार, या आजाराची लागण झालेल्या रुग्णांच्या फुफ्फुसांवर परिणाम होत असतो. आता एका अभ्यासात समोर आलं आहे की, कोरोनातून बरे झालेल्या तीन पैकी एका व्यक्तीला आयुष्यभर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकते. दीर्घकाळासाठी त्यांचा फुफ्फुसाला देखील नुकसान पोहचू शकतं.

ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या गाइडेंसनुसार, कोरोनातून बरे झालेल्या ३० टक्के रुग्णांच्या फुफ्फुसाला नुकसान पोहचू शकते. त्यांना वारंवार थकवा जाणवणं आणि मानसिक आरोग्याची समस्या होऊ शकते. आयसीयूमधून बरे होऊन परतलेल्या रुग्णांवर दीर्घकाळ याचे परिणाम होऊ शकतात.

आरोग्यविषयक तज्ञांनी म्हटलं या गोष्टींचे वारंवार पुरावे मिळत आहेत की कोरोनामुळे शरीरावर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतात. बरे झालेल्या रुग्णांच्या मेंदूवर देखील परिणाम होऊ शकतो. त्यांना अलजाइमर होण्याचा धोका निर्माण होतो.

एनएचएसच्या कोव्हिड रिकव्हरी सेंटरच्या प्रमुख हिलरी फ्लॉयड म्हणाल्या की, कोरोनाच्या दीर्घकालीन परिणामाबद्दल फारशी माहिती नाही याची चिंता आहे. कोरोना नेगेटिव्ह असूनही बर्‍याच रुग्णांना उपचारांची आवश्यकता असते.

त्यांनी सांगितलं की, ४०-५० वर्षांचे जे रुग्ण बरे झाले आहेत त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हे लोक जिम, स्विमिंग, उद्योग या गोष्टी स्वतः करत असे. मात्र कोरोना नेगेटिव्ह असताना देखील ते स्वतःच्या बेडवरून उठू शकत नाहीत.



हेही वाचा

Ramdev Baba : पतंजलीला नोटीस, आयुष मंत्रालयानं उचललं 'हे' कडक पाऊल

Ramdev Baba : पतंजलीच्या कोरोनील औषधाबद्दल जाणून घ्या ‘या’ १३ गोष्टी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा