मुंबईतील 'या' आठ पर्यटन स्थळांवर मुलांसाठी लसीकरण मोहीम

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

शनिवार, 28 मे रोजी, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईतील आठ पर्यटन स्थळांवर मुलांसाठी लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. मुलांसोबतच प्रौढांनाही इथं लस देता येऊ शकते. या व्यतिरिक्त, ज्येष्ठ नागरिक, आरोग्यसेवा कर्मचारी किंवा फ्रंटलाइन कामगारांना बूस्टर डोस देखील दिला जाईल.

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी, डॉ मंगला गोमारे यांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता, कुटुंबे या पर्यटन स्थळांना भेट देतात. त्यामुळे त्यांनी पर्यटन स्थळांवर बूथ उभारण्याचा निर्णय घेतला.

मुंबईतील १२-१४ वयोगटातील १० टक्के मुलांना पूर्णपणे लस टोचण्यात आल्याचे सागण्यात आले आहे. तर महाराष्ट्राचा आकडा २४ टक्के आहे.

गेटवे ऑफ इंडिया, जहांगीर आर्ट गॅलरी आणि छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम, भायखळ्याचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय, अंधेरीची महाकाली लेणी, स्नो वर्ल्ड फिओनिक्स मॉल, आरे येथील प्रेक्षणीय स्थळांवर ही मोहीम सुरू झाल्याचे सांगण्यात आले. कॉलनीतील छोटा काश्मीर बोटिंग क्लब आणि घाटकोपरच्या आर सिटी मॉलमधील किडझानिया इथही बुथ सुरू करण्यात आले आहेत.

राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, अस्लम शेख यांनी इशारा दिला होता की जर संख्या वाढतच राहिली तर राज्यात निर्बंध लावण्याचा विचारकरावा लागेल. या निर्बंधांमध्ये मास्क घालणे अनिवार्य करण्यात येईल.


हेही वाचा

महाराष्ट्र सरकारला काही निर्बंध लागू करण्याबाबत विचार करावा लागेल - उपमुख्यमंत्री

"...तर महाराष्ट्रात निर्बंध लागण्याची शक्यता", अस्लम शेख यांचा इशारा

पुढील बातमी
इतर बातम्या