Advertisement

"...तर महाराष्ट्रात निर्बंध लागण्याची शक्यता", अस्लम शेख यांचा इशारा

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

"...तर महाराष्ट्रात निर्बंध लागण्याची शक्यता", अस्लम शेख यांचा इशारा
(File Image)
SHARES

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राज्यात दररोज कोविड -19 पॉझिटिव्ह प्रकरणे हजाराहून अधिक झाल्यास पुन्हा निर्बंध लागू करण्यात येतील असे संकते दिले आहेत. याशिवाय, प्रकरणे वाढत राहिल्यास लॉकडाऊनचा इशाराही त्यांनी दिला.

पत्रकारांशी संवाद साधताना शेख म्हणाले की, ज्या वेगाने रुग्ण वाढत आहेत, त्यावर निर्बंध घालावे लागतील. विमान कंपन्यांवरील निर्बंध अजूनही कायम आहेत. लोकांनी काळजी न घेतल्यास, लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही. तज्ञांनी या वर्षी जून-जुलैमध्ये चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, मंत्र्यांनी असेही नमूद केले की राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन निर्बंधांबाबत निर्णय घेईल.

नुकतेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचे आणि सगळे नियम पाळण्याचे आवाहन केले होते.

मुंबईसह महाराष्ट्रात करोना रुग्ण हळूहळू वाढत आहेत. गुरुवारी, २६ मे रोजी राज्यात ५०० हून अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली. मुंबईत ३०० चा टप्पा ओलांडल्याने करोना रुग्णामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने सप्टेंबर महिन्यात चौथ्या लाट येऊ शकते, असे म्हटल्यानंतर पुन्हा एकदा रुग्णवाढ पाहायला मिळत आहे. चौथ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन, महापालिकेने आधीच सांगितले आहे की त्यांच्या सर्व जंबो कोविड-१९ सुविधा किमान सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहेत.

राज्यातील करोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. राज्यात लसीकरणासाठी पात्र असलेल्या १० कोटी लोकसंख्येपैकी केवळ ७० टक्के लोकांनी आतापर्यंत लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

अजूनही ३० टक्के लोकांना लस मिळालेली नाही. अलीकडील अभ्यासात हे स्पष्ट झाले आहे की, करोनाची तीव्रता रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. यानंतरही अनेकजण लसीकरणात रस घेत नाहीत.



हेही वाचा

पालिका मुंबईतील 'ही' ३ कोविड सेंटर करणार बंद

मंकीपॉक्ससाठी पालिकेची तयारी, रुग्णांसाठी उभारला स्वतंत्र वॉर्ड

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा