Lockdown in Thane: ठाण्यात १२ जुलैपर्यंत कडक लाॅकडाऊन, ‘हे’ नियम पाळावेच लागतील

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात २ जुलै रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते १२ जुलै सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्याची घोषणा प्रशासनाने केली आहे. विशेषकरून शहरातील कटेन्मेंट झोनमध्ये लाॅकडाऊनची अंमलबाजवणी अधिक कडकपणे करण्यात येणार आहे.  ठाणे महापालिका आयुक्त आणि ठाणे पोलिस संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाची चिंता देखील वाढली आहे. त्यामुळे एका बाजूला राज्यात दुसऱ्या टप्प्यातील अनलाॅकला सुरूवात होत असतानाच ठाण्यात मात्र कठोर लाॅकडाऊन करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. ठाण्यामध्ये २९ जून २०२० रोजीच्या आकडेवारीनुसार ३६,००२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १४, ६५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २०,४७४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शिवाय ८७१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. यापार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त आणि ठाणे पोलीस आयुक्तांमध्ये बैठक झाली या बैठकीनंतर २ जुलैपासून महापालिका क्षेत्रात कडक लाॅकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा - मिरा-भाईंदरमध्ये बुधवारपासून कडक लाॅकडाऊन

या लाॅकडाऊन दरम्यान निर्बंध पुढीलप्रमाणे: 

  • अत्यावश्यक सेवेतीली कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा. सरकारी कार्यालयात वावरताना कर्मचाऱ्यांमध्ये कमीत कमी ३ फूट अंतर राखणं आवश्यक,  योग्य स्वच्छता आणि हात सॅनेटायझर्सने स्वच्छ करणं आवश्यक 
  • जीवनावश्यक आणि नाशवंत वस्तूच्या ने-आण कारणाशिवाय इतर सर्व कारणांसाठी मनाई
  • आपत्कालीन वैद्यकीय सेवेअंतर्गत प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी.
  • सगळ्या आंतरराज्यीय बस, प्रवासी वाहतूक, खासगी वाहने, खासगी ऑपरेटर्सचं कामकाज बंद असेल, बाहेर जाणाऱ्या टुरिस्ट वाहनांना परवानगी असेल
  • सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास परवानगी नाही
  • व्यावसायिक अस्थापना कार्यालये, कारखाने, कार्यशाळा गोदाम इत्यादींसह सर्व दुकाने त्यांचं कामकाज बंद ठेवतील. वैद्यकीय उत्पादने, डाळ, तांदूळ, गिरणी, खाद्य व संबंधि उद्योग, दुग्धशाळा, खाद्य व चारा इत्यादींच्या आवश्यक वस्तूंच्या उत्पादनांच्या युनिट्सना संमती

हेही वाचा- वसई, विरार, नालासोपाऱ्यात 'असे' आहेत कंटेन्मेंट झोन

पुढील बातमी
इतर बातम्या