पाणी भरण्याच्या वादातून एका महिलेने आपल्या शेजाऱ्याची हत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास विरारमधील जे.पी. नगर येथे घडली. अर्नाळा सागरी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.
उमेश पवार (57) हे विरार पश्चिमेतील जे.पी. नगर येथील इमारत क्रमांक 15 मध्ये राहत होते. पाणी वापराबाबत त्यांचा समोर राहणाऱ्या शेजारी कुंदा तुपेकर (46) यांच्यासोबत दीर्घकाळापासून वाद सुरू होता.
मंगळवारी रात्री दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. दरम्यान, संतापाच्या भरात कुंदा तुपेकर यांनी उमेश पवार यांच्या चेहऱ्यावर मच्छर मारण्याचे स्प्रे फवारला. त्यामुळे ते बेशुद्ध पडले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.
“आम्ही खूनाच्या गुन्ह्या अंतर्गत केस नोंदवून आरोपी महिला कुंदा तुपेकर हिला अटक केली आहे,” अशी माहिती अर्नाळा सागरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी दिली.
हेही वाचा