सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांचे भाव कडाडले

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत कांदा-बटाटा वगळता बहुतांश सर्व भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. लहरी पावसामुळे घटलेले उत्पादन, इंधन दरवाढ आणि आता पितृपक्ष पंधरवड्यामुळे मागणीत झालेली वाढ यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत.

काही दिवसांपूर्वी २० रुपये किलोला विकला जाणारा टोमॅटो आता ४५ रुपयांवर पोहोचला आहे. तर, ४० रुपयांना विकली जाणारी गवार १०० रुपये किलो अशी विकली जात आहे. प्रत्येक भाज्यांमागे २० ते ३० रुपये प्रतिकिलो भाव वाढला आहे.

वाशी इथल्या ‘एपीएमसी’च्या भाजीपाला बाजारात मंगळवारी आवक कमी झाली आहे. बाजारात रोजच्या सुमारे ६०० गाड्यांऐवजी ४८४ गाड्या भाज्यांची आवक झाली आहे. आधी प्रतिकिलो १० ते २० रुपयांनी मिळत असलेल्या भाज्यांचा दर आता २० ते ३० रुपये प्रतिकिलो झाला आहे.

  • कारले : ६०
  • दोडके : ३५
  • भेंडी : ६०
  • गवार : ६०
  • हिरवी मिरची : ६०
  • वांगे- ४०
  • शिमला मिरची : ४०
  • घेवडा : ६०
  • बटाटा : ३५
  • मेथी : ४० रुपये जुडी
  • कोथिंबीर : ४० रुपये जुडी
  • कांदापात : ४० रुपये जुडी
  • शेपू : ३५ ते ४० रुपये जुडी
  • पालक : ३५ रुपये जुडी

घाऊक बाजारात वाढ झाल्यानं या सर्व भाज्या किरकोळ बाजारात दुप्पट ते तिप्पट दरानं विकल्या जात आहेत. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खचार्त वाढ झाल्यानं ही दरवाढ करण्यात आली आहे.

मुंबईसह पुण्यात देखील भाजीचे दर चढेच आहेत.

पुण्यात भाजीचे दर (किलो)

  • कोथिंबीर: २५ ते ३० रु.
  • मेथी: २५ ते ३० रु.
  • गवार: १०० ते १२० रु.
  • वांगी: ६० ते ७० रु.
  • मटार: १४० ते १६० रु.
  • घेवडा : ८० ते १०० रु.
  • भेंडी: ७० ते ८० रु.
  • राजमा: ८० ते १०० रु.
  • फ्लॉवर : १०० ते १२० रु.


हेही वाचा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९९ टक्के पाणीसाठा

गणेशोत्सवात कोकणात गेलेल्या २७२ जणांना कोरोना

पुढील बातमी
इतर बातम्या