मुंबईतील वाहनांच्या संख्येत 'इतकी' वाढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चालली आहे. मागील एका वर्षात मुंबईत .८७ लाख वाहनं वाढली आहेत. महापालिकेच्या मदतीने करण्यात आलेल्या पर्यावरण स्थिती अहवालातून (ESR) या वाहनांती माहिती समोर आली आहे. वाहनांच्या या वाढत्या संख्येमुळं मुंबईतील अनेक महत्वाच्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

वाहनांची संख्या ३६.४ लाख

दुचाकींची भर

गेल्या एका वर्षात मुंबईच्या रस्त्यांवर १.८ लाख दुचाकींची भर पडली आहे. यानंतर कार, एसयुव्ही आणि इतर वाहनांचा समावेश आहे. २०१८ च्या तुलनेत इतर वाहनांची संख्या ६८ हजार २०९ नं वाढली आहे. दरम्यान, सार्वजनिक वाहतूक वाहनांमध्ये टॅक्सीच्या संख्येत घट झाली असून ८४१५ नं संख्या कमी झाल्याची माहिती आहे. तसंच, रिक्षा आणि बसेसच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. रिक्षाच्या संख्येत ३० हजार ६२२ नं तर बसेसच्या संख्येत १२१२ नं वाढ झाली आहे.

वाहतूक समस्या

दुचाकींच्या संख्येत होत असलेल्या वाढीमुळं मुंबईच वाहतूक समस्या निर्माण होत असल्याचं म्हटलं जात आहे. तसचं, मेट्रोचं बांधकाम, रस्त्यांची दुरुस्ती आणि इतर निर्माणधीन कामांमुळं वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे. मुंबईतील रस्त्यावर असणाऱ्या ३६.४ लाख वाहनांमध्ये दुचाकींची संख्या सर्वात जास्त ५८.६१ टक्के इतकी आहे. यानंतर चारचाकी, एसयुव्हीचा क्रमांक आहे. तसंच रस्त्यांवर टॅक्सींची संख्या ३.२८ टक्के, रिक्षा ५.८४ टक्के आणि बसेसची संख्या ०.४४ टक्के इतकी आहे. याशिवाय इतर वाहनांचीही नोंद आहे. यामध्ये २.०४ टक्के माल वाहने, .०२ टक्के ट्रॅक्टर/ट्रेलर, आणि इतर वाहनांची संख्या ०.१० टक्के आहे.

२६ टक्के वाढ

दरम्यान, एलपीजी आणि सीएनजी वापरणाऱ्या टॅक्सी आणि रिक्षांच्या संख्येतही वाढ झाली आहे. एलपीजी आणि सीएनजी वापरणाऱ्या टॅक्सींच्या संख्येत २.३ टक्के तर रिक्षांच्या संख्येत १.७३ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ २६ टक्के इतकी आहे.


हेही वाचा -

मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी

सांडपाणी प्रक्रियेसाठी महापालिकेतर्फे ७ प्रक्रिया केंद्राची उभारणी


पुढील बातमी
इतर बातम्या