Advertisement

मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी

मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली.

मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी
SHARES

मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली. मागील काही दिवस पावसानं विश्रांती घेतली होती. परंतु, मंगळवारी

रात्रीपासून मुंबईत मुसळधार पावसानं विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. दरम्यान, पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे.


मुसळधार पाऊस


विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुंबईच्या विविध भागांत रात्रभर पाऊस पडत आहे. पहाटे पावसाचा जोर

अधिकच वाढला आहे. दक्षिण मुंबईसह उपनगरातही सर्वदूर पाऊस कोसळत आहे. ऐन नवरात्रोत्सवाच्या तोंडावर पाऊस पडत

असल्यानं अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांना देवीचं आगमन पावसात करावं लागणार आहे.


विजांचा कडकडाट


मुंबईसह उपनगरात, पालघरविरारमिरा-भाइंदरठाणेभिवंडीकल्याणडोंबिवलीअलिबाग या भागांत पुढील ४ ते ६

तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे. तसंच, पुढील २ तास प्रामुख्यानं मुंबई आणि

उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळेल असा अंदाज

हवामान विभागानं वर्तवला आहे.



हेही वाचा -

शरद पवार, अजित पवारांवर ईडीकडून गुन्हा दाखल

अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा