Advertisement

अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर


अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
SHARES

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांना सिनेसृष्टीतील योगदानाबाबत हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

अमिताभ बच्चन यांनी सात हिंदुस्थानी या सिनेमापासून आपली कारकीर्द सुरु केली होती.

आपल्या अभिनयाने गेल्या २ दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे तसंच सर्वांना प्रोत्साहीत करणारे अमिताभ बच्चन यांचे नाव सर्वसंमतीने निवडण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याने संपूर्ण देश तसंच परदेशातील लोकांना आनंद झाला आहे. माझ्याकडून अमिताभ यांना मन:पूर्वक शुभेच्छा, असं जावडेकर यांनी ट्विटरवरून म्हटले आहे.हेही वाचा

मन उधाण वारामध्ये 'ही' आहे फ्रेश जोडी

‘३ इडियट्स’मधील सेंटीमीटरला मिळणार ‘शिष्यवृत्ती’


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय