‘३ इडियट्स’मधील सेंटीमीटरला मिळणार ‘शिष्यवृत्ती’

आज बरेच मराठी कलाकार हिंदी सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवत आहेत. ‘३ इडियट्स’ या सिनेमात सेंटीमीटरच्या भूमिकेत दिसलेल्या दुष्यंत वाघ या कलाकारानंही आपल्या अभिनयानं सर्वांना आकर्षित केलं होतं. आता त्याला ‘शिष्यवृत्ती’ मिळाली आहे.

SHARE

आज बरेच मराठी कलाकार हिंदी सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवत आहेत. ‘३ इडियट्स’ या सिनेमात सेंटीमीटरच्या भूमिकेत दिसलेल्या दुष्यंत वाघ या कलाकारानंही आपल्या अभिनयानं सर्वांना आकर्षित केलं होतं. आता त्याला ‘शिष्यवृत्ती’ मिळाली आहे.

होय, ‘३ इडियट्स’मधील सेंटीमीटरला ‘शिष्यवृत्ती’ मिळणार हे खरं आहे, पण वास्तवात नव्हे तर रुपेरी पडद्यावर. सेंटीमीटरची प्रेरणादायी भूमिका साकारणारा दुष्यंत वाघ आता ‘शिष्यवृत्ती’ या आगामी मराठी सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं एक वेगळंच अतूट नातं असतं. आपल्याला समजायला लागल्यापासून जीवनाच्या अखेरपर्यंत हे नातं जुळलेलं असतं. शिक्षकांनी दिलेली चांगली शिकवण घेऊन आपण आयुष्यात अनेक यशस्वी गोष्टी करत असतो. अशाच शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या भावविश्वावर आधारित असलेला ‘शिष्यवृत्ती’ हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात दुष्यंत एका शिक्षकाच्या तर रुद्र ढोरे विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांभोवतीच या सिनेमाची कथा गुंफण्यात आली असून, त्यांच्या अनुषंगानं शिक्षक-विद्यार्थ्यातील अतूट नातं अधोरेखित करण्यात आलं आहे. साज एटरटेनमेंट प्रस्तुत आणि अखिल देसाई निर्मित आणि दिग्दर्शित ‘शिष्यवृत्ती’ हा सिनेमा १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात दुष्यंतसोबत रुद्र ढोरे, अंशुमन विचारे, झील पाटील, प्रशांत नगरे, कमलेश सावंत, अनिकेत केळकर, उदय सबनीस आदी कलाकार आहेत. या चित्रपटातील गाणी प्रसन्नजीत कोसंबी, जयदीप बागवडकर आणि मिथीला माळी यांच्या सुरात सजली असून, भरतसिंग यांचं संगीत चित्रपटातील गीतांना लाभलं आहे.हेही वाचा -

'अशी ही बनवाबनवी'ची ३१ वर्ष, आजही हे १० डायलॉग प्रेक्षकांना हसवतात

बघा, 'असं' आहे 'बिग बॉस १३' चं प्लास्टिकमुक्त घर!
संबंधित विषय
ताज्या बातम्या