Advertisement

बघा, 'असं' आहे 'बिग बॉस १३' चं प्लास्टिकमुक्त घर!

प्रत्येक सिजनमध्ये बिग बॉसचं घर आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. यंदा 'बिग बॉस १३'च्या सिजनमधील घर कुठल्या थीमवर आधारीत आहे? आणि त्याची कशी सजावट केली आहे? याची खास झलक आम्ही घेऊन आलो आहोत.

SHARES

मराठी 'बिग बॉस २' नंतर आता हिंदी बिग बॉस लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजन करायला येणार आहे. २९ सप्टेंबरपासून बिग बॉस कलर्स या चॅनलवर पाहता येणार आहे. यावर्षीचा हा १३ वा सिजन असून अभिनेता सलमान खान या सिजनचा होस्ट असेल. यावर्षी सहभागी स्पर्धकांच्या नावाची माहिती अजून उघड करण्यात आली नाही. त्यामुळे कुठले स्पर्धक यात सहभागी आहेत हे आम्हाला सध्या सांगता येणार नाही. पण बिग बॉसच्या चाहत्यांना आम्ही निराश करणार नाही. स्पर्धकांची नावं नसली तरी काय झालं पण बिग बॉसचं घर तर तुम्हाला पाहता येईल.

आकर्षक घर

प्रत्येक सिजनमध्ये बिग बॉसचं घर आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. यावर्षी देखील एका वेगळ्याच थीमवर घराची रचना करण्यात आली आहे. गोरेगाव इथल्या फिल्मसिटीमध्ये बिग बॉस १३ च्या घराचा सेट उभारण्यात आला असून याची पहिली झलक आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.


प्लास्टिकमुक्त घर

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या शो ची थीम देखील वेगळी आहे. थीमला अनुसरून घरामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यावेळी इको-फ्रेंडली वस्तूंचा वापर करुन हे घर सजवण्यात आलं आहे. यात प्लास्टिकचा वापर कटाक्षानं टाळला आहे. याशिवाय वेगवेगळ्या रंगांचा अधिक वापर करण्यात आला आहे. गार्डन एरियामध्ये हिरवं गवत पसरलं असून लिव्हिंग एरियामध्ये फ्लोरोसेंट आणि गुलाबी या रंगाचा सर्वाधिक वापर करण्यात आला आहे. १४ लोकांसाठी बेडरुममध्ये झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र तीन जणांना एक बेड शेअर करावा लागणार आहे.

१८ हजार ५०० स्क्वेअर फूटाच्या जागेमध्ये हा सेट उभारण्यात आला आहे. या घरामध्ये ९३ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यंदा या शो मध्ये १४ स्पर्धक सहभागी होणार असून त्यांना १०० दिवस या घरामध्ये रहायचं आहे.





Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा