मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे पाणी बिल थकीत

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सामान्य नागरिकांनी पाणी बिल थकवल्यावर पाणीपुरवठा खंडीत करणारी बृहन्मुंबई महानगरपालिका (brihanmumbai municipal corporation) मध्य (central railway) आणि पश्चिम रेल्वेवर भलतीच उदार झाली आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने महानगरपालिकेचे 500.80 कोटी रुपयांचे पाण्याचे बिल (water bill) 9 सप्टेंबर 2025 पर्यत थकवले आहे.

इतकी मोठी थकबाकी असली तरी रेल्वे प्रशासनाविरोधात कोणतीही मोठी कारवाई केली नसल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एकीकडे मुंबईकरांसाठी एक नियम तर इतर यंत्रणासाठी दुसरे नियम मुंबई महापालिका राबवत असल्याचे समोर आले आहे.

मुंबई (mumbai) महानगरपालिकेची (bmc) मध्य रेल्वेकडे 172.10 व पश्चिम रेल्वेकडे 328.70 अशी एकूण सुमारे 500.80 पाणीपट्टी थकबाकी आहे. पालिकेने पश्चिम रेल्वेला 201 पाणीजोडणी दिले आहे. तर मध्य रेल्वेला 182 पाण्याची जोडणी देण्यात आले आहे.

सद्यस्थितीत पाणीपट्टीची थकबाकी वाढू लागल्यामुळे भविष्यात जलविषयक कामांवर परिणाम होण्याची शक्यता जल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

पश्चिम रेल्वेचे (western railway) रोज 32 ते 35 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यातून पश्चिम रेल्वेला वर्षाकाठी 4 हजार कोटींचे उत्पन्न मिळते. थोडक्यात वर्षाकाठी पश्चिम आणि मध्य रेल्वे मुंबई विभागातून 10 ते 12 हजार कोटी रुपये कमावतात.

'नवशक्ति' ने दिलेल्या वृत्तानुसार मात्र महापालिकेला 500.80 कोटी द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत, असेही एका मुंबई महापालिका अधिकाऱ्यांने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.

मध्य-पश्चिम रेल्वे प्रशासनाने महानगरपालिकेचे 500.80 कोटी रुपयांचे पाण्याचे बिले गेल्या काहीं वर्षांपासून थकवले आहे. 9 सप्टेंबर 2025 पर्यंत मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेचे मिळून 500.80 इतकी थकबाकी आहे.

ही पाणीपट्टी थकबाकी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून महापालिकेला देणे आहे. मुंबई महानगरपालिकेकडून रेल्वेला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पालिकेच्या भूमिकेवर शंका उपस्थित होत आहे.


हेही वाचा

ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचे बांधकाम नोव्हेंबरमध्ये सुरू होणार

मुंबईच्या आठव्या धरण प्रकल्पाला गती देण्याचा सरकारचा प्रयत्न

पुढील बातमी
इतर बातम्या