ठाणे महानगरपालिके (TMC)नं ४ डिसेंबर रोजी या भागात पाणी कपात होईल अशी घोषणा केली आहे. मुख्य पाइपलाइनच्या दुरुस्तीच्या कामामुळे २४ तास पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. असल्याचं बोलले जात आहे.
शुक्रवारी ( ४ डिसेंबर) सकाळी ९ ते शनिवार (५ डिसेंबर) सकाळी ९ वाजेच्या दरम्यान परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल.
ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ठाण्यातील बहुतांश भागांवर परिणाम होणार आहे.
पाणी कपातीचे कारण म्हणजे मेट्रोच्या बांधकामाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कालावधीत शहाद टेमघर (STEM) जलसंपदा कंपनी बंद राहणार आहे. मेट्रोच्या कामासाठी १ हजार १०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर काम सुरू आहे.
तसंच साकेत पुलाखालील मुख्य कालव्यावरील क्रॉस-कनेक्शन वॉल्व बदलण्यात येतील. त्यामुळे लोकांना आवश्यक तेवढेच पाणी वापरावं आणि पर्यायी व्यवस्था करावी, असा सल्ला दिला आहे.
हेही वाचा