Advertisement

मुंबई : वृक्ष प्राधिकरणानं इन्फ्रा प्रकल्पांसाठी १,२३४ झाडं तोडण्यास दिली मान्यता

वृक्ष प्राधिकरणानं मुंबईतील विस्तृत पायाभूत प्रकल्पांसाठी १ हजार २३४ झाडं तोडण्यास आणि पुर्नरोपणास मान्यता दिली आहे.

मुंबई : वृक्ष प्राधिकरणानं इन्फ्रा प्रकल्पांसाठी १,२३४ झाडं तोडण्यास दिली मान्यता
SHARES

वृक्ष प्राधिकरणानं मुंबईतील विस्तृत पायाभूत प्रकल्पांसाठी १ हजार २३४ झाडं तोडण्यास आणि पुर्नरोपणास मान्यता दिली आहे. शिवडी ते न्हावा शेवापर्यंत मुंबई ट्रान्स हार्बर (MTHL)चं काम सुरू आहे. यामुळे जवळपास ९४६ झाडं तोडण्यात येणार आहेत.

एमटीएचएलकडून एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) हा प्रकल्प हाती घेईल आणि त्याला आता वृक्ष प्राधिकरणाकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एमटीएचएल प्रकल्पासाठी कापलेली झाडे वसईच्या कामाण आणि राजावली खेड्यात लावली जातील.

वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष मनपा आयुक्त इक्बालसिंग चहल हे आहेत. २ डिसेंबर रोजी समितीसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ९४६ झाडांपैकी ४२० तोडली जातील. तर ५२६ शहरातील इतर ठिकाणी पुर्नरोपित केली जातील.

नुकतंच समितीनं महालक्ष्मी रेल्वे स्थानकातील पुलासाठी २५६ झाडं तोडण्यास आणि पुर्नरोपीत करण्यास मान्यता दिली. सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळील हॅनकॉक पुलासाठी ३२ झाडं तोडण्याच्या आणखी एका प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या तीन प्रकल्पांमधून झाडाची किंवा पुनर्स्थित केलेल्या झाडांची एकूण संख्या १ हजार २३४ वर जाते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यानं सांगितलं की, काही झाडे लावण्याबरोबरच नुकसानीची भरपाई करण्यासाठी अधिकाधिक झाडे लावण्यात येणार आहेत. एकूण २ हजार हजार वृक्षांचं पुर्नरोपण करण्यात येणार आहे.



हेही वाचा

डिसेंबरमध्ये दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद

महाराष्ट्र : २०२०मध्ये बिबट्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ, ५ वर्षांतील सर्वाधिक मृत्यूची नोंद

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा