बुधवारी ठाण्यातल्या 'या' भागांमधील पाणीपुरवठा बंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्प्या टप्प्यानं शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.

स्टेम प्राधिकरणाकडून पावसाळ्यापुर्वीच्या दैनंदिन देखभाल दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार असून या कामांमुळे बुधवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 

बुधवार, १५ जून रोजी सकाळी ९ ते गुरुवार, १६ जून रोजी सकाळी ९ यावेळेत शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यानुसार घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ या भागांचा पाणी पुरवठा बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत बंद राहील.

तर, समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, ईटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्याचा व मुंब्राचा काही भाग या भागांचा बुधवारी रात्री ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत पाणी पुरवठा बंद राहील. या बंदनंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा

मुंबईतल्या 'या' विभागांमध्ये गॅस्ट्रो, मलेरियाचे रुग्ण सर्वाधिक

मुंबई मेट्रो लाइन 2A, 7 चा दुसरा टप्पा पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता

पुढील बातमी
इतर बातम्या