Advertisement

मुंबईतल्या 'या' विभागांमध्ये गॅस्ट्रो, मलेरियाचे रुग्ण सर्वाधिक

शहरात पावसाळा सुरू होताच मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोसारख्या आजारांमध्ये वाढ होत आहे.

मुंबईतल्या 'या' विभागांमध्ये गॅस्ट्रो, मलेरियाचे रुग्ण सर्वाधिक
(Representational Image)
SHARES

कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असतानाच दुसरीकडे गॅस्ट्रोएन्टेरिटिस (गॅस्ट्रोएन्टेरिटिस मलेरिया) आणि मलेरियाच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. शहरात पावसाळा सुरू होताच मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोसारख्या आजारांमध्ये वाढ होत आहे.

जूनच्या पहिल्या पाच दिवसांत मलेरियामुळे सुमारे ६०, गॅस्ट्रोमुळे ८० आणि डेंग्यूमुळे १० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, वांद्रे, खार, सांताक्रूझ, माझगाव, नागपाडा आणि भायखळा येथे गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात वरळी, लोअर परळ, प्रभादेवी आणि महालक्ष्मीमध्ये मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण आढळले.

मात्र, दिलासादायक बाब म्हणजे या आजारांमुळे एकही मृत्यू झाला नाही. डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी, असे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मेट्रोचे काम, इतर बांधकामासोबतच दक्षिण मुंबईतील वॉर्डांमध्ये मलेरिया आणि डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

डेंग्यू आणि मलेरियाची लक्षणे म्हणजे खूप ताप, शरीरात तीव्र वेदना, मळमळ आणि डोकेदुखी. जानेवारी ते जून या कालावधीत मुंबईत मलेरियाचे ९५०, डेंग्यूचे ९४, लेप्टोस्पायरोसिसचे २४, गॅस्ट्रोचे २४४२ आणि हिपॅटायटीसचे २०४ रुग्ण आढळले आहेत.हेही वाचा

मुंबईत शुक्रवारी सापडले 1 हजार 956 कोरोना रुग्ण

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा