Advertisement

मुंबईत शुक्रवारी सापडले 1 हजार 956 कोरोना रुग्ण

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.

मुंबईत शुक्रवारी सापडले 1 हजार 956 कोरोना रुग्ण
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. मागील 24 तासांत 1 हजार 956 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. गुरुवारी ही रुग्णसंख्या 1702 असल्याने 254 रुग्णांची अधिक वाढ आज झाली आहे. ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून नागरिकांनाही काळजी घेणं अनिवार्य झालं आहे.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी 1 हजार 956 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्ण दुपटीचा दरही वाढत असल्याने चिंतेचं कारण आणखी वाढलं आहे. 642 दिवसांवर आता हा दर पोहोचला आहे.

शुक्रवारी राज्यात ३ हजार 81 रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, मागील 24 तासांत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर दिवसभरात 1323 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 77,43,513 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.96% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा आहे.



हेही वाचा

55 दिवस मुंबईकरांना पुरेल एवढा पाणीसाठाच शिल्लक - पालिका

सोसायटीच्या मजल्यावर कोरोना रुग्ण सापडल्यास...ठाणे आयुक्तांचे आदेश

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा