Advertisement

सोसायटीच्या मजल्यावर कोरोना रुग्ण सापडल्यास...ठाणे आयुक्तांचे आदेश

आरोग्य विभागाने मंगळवारी सकाळपासूनच प्रक्रियेला सुरूवात केली आहे.

सोसायटीच्या मजल्यावर कोरोना रुग्ण सापडल्यास...ठाणे आयुक्तांचे आदेश
SHARES

एखाद्या मजल्यावर कोरोना रुग्ण सापडल्यास त्या मजल्यावरील सर्व रहिवाशांच्या चाचण्या करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत. यानंतर आरोग्य विभागाने मंगळवारी सकाळपासूनच प्रक्रियेला सुरूवात केली आहे. ठाण्यातल्या रहिवाशांसाठी बा नियम लागू करण्यात आला आहे. 

ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण माजिवडा मानपाडा क्षेत्रात सापडत आहेत. म्हणजेच, घोडबंदर भागातील उच्च मध्यमवर्गीय तसेच उच्चभ्रू वसाहतीमध्ये अधिकाधिक करोना रुग्ण सापडत आहेत.

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन चाचण्या वाढविण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी डॉ. शर्मा यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या सूचना दिल्या होत्या. या बैठकीत उपायुक्तांसह स्थानिक पातळीवर कार्यरत असलेले सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.

लसीकरणात हरघर दस्तक ही मोहीम प्रभावीपणे राबवीत असताना आता घरोघरी जाऊन चाचण्या सुरू करण्याचे बैठकीत ठरले आहे. त्यानुसार घोडबंदर भागातील १२ इमारतींमध्ये काही ठराविक मजल्यांवर आज सुरूवात करण्यात आली. यापुढेही ज्या मजल्यावर रुग्ण सापडतील तिथे ही मोहित सुरू राहील अशी माहिती पालिकेतील सुत्रांनी दिली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) उघड केलेल्या ताज्या अहवालानुसार, बहुतेक प्रकरणं एस वॉर्डातील उच्चस्तरीय सोसायट्यांमधून नोंदवली गेली आहेत.

पवई, भांडुप आणि कांजूरमार्ग सारख्या क्षेत्रांचा समावेश असलेल्या एस वॉर्डमध्ये गेल्या आठवड्यात तब्बल 148 कोविड-19 पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली.

आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी पुढे सांगितले की, यापैकी जवळपास 60 टक्के प्रकरणे हिरानंदानी आणि आयआयटी बॉम्बे क्षेत्रातील 12 सोसायट्यांमधून नोंदवली गेली आहेत. तथापि, सध्या, आयआयटी बॉम्बेमध्ये 10 सक्रिय प्रकरणे आहेत.

पवईतील गृहनिर्माण संस्थांमध्ये ब्रेंटवुड, एव्हलॉन, राज ग्रॅन्डर, जलतरंग, एविटा, गोल्डन ओक, टोरिनो हिरानंदानी साउथ अव्हेन्यू, पवई कॉस्मोपॉलिटन, हिरानंदानी झेन मॅपल, ट्रिनिटी, स्कायलाइन व्हिला, महाडा आणि शिवनेरी (आयआयटी बॉम्बे) यांचा समावेश आहे.



हेही वाचा

पालिकेच्या एस वॉर्डमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद

लवकरच मास्क घालणे अनिवार्य करणार: आदित्य ठाकरे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा