या कामासाठी संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. दुरुस्ती कामाच्या कालावधीत जी दक्षिण व जी उत्तर विभागातील खालील परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.
जी दक्षिण विभागातील करी रोड (currey road), सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ, लोअर परळ परिसर, ना. म. जोशी मार्ग येथील पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.
तसेच संपूर्ण प्रभादेवी परिसर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, आदर्श नगर, जनता वसाहत, अप्पासाहेब मराठे मार्ग, वीर सावरकर मार्ग, ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, गणपतराव कदम मार्ग, प्रभादेवी आणि संपूर्ण लोअर परळ स्थानक परिसरातील पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.
जी उत्तर विभागातील सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग येथील पाणीपुरवठा पूर्णत: बंद (water cut) राहील.
तसेच सेनापती बापट मार्ग, एल. जे. मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, अरूणकुमार वैद्य मार्ग येथील पाणीपुरवठा अंशत: बंद राहील.
कृपया संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच पाणीपुरवठा बंद केलेल्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या (BMC) वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा