Advertisement

देवेंद्र फडणवीस यांचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून पुनरागमन ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एका सूत्राने माहिती दिली की, भाजप आणि शिवसेना यांच्यात सत्तावाटपाचा करार झाला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून पुनरागमन ?
SHARES

देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे (maharashtra) मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एका सूत्राने माहिती दिली की, भाजप आणि शिवसेना यांच्यात सत्तावाटपाचा करार झाला आहे.

ठरल्यानुसार, देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) हे अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. त्यानंतरची अडीच वर्षे एकनाथ शिंदे (eknath shinde) पदभार स्वीकारतील. 

पण अशी देखील चर्चा आहे की, देवेंद्र फडणवीस यांची वर्णी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी लागू शकते. जर असे झाल्यास त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. मग उरलेली वर्षे भाजपच्याच दुसऱ्या मंत्री मुख्यमंत्रीपदावर विराजमान होऊ शकतात. भाजपचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपला की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. 

भाजप आणि आरएसएस (RSS) यांच्यात सामंजस्य राखण्याची देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रविवारी रात्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. सर्व 57 आमदार नियुक्तांनी त्यांना पाठिंबा देणारा ठराव एकमताने मंजूर केला.

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी सलग चौथ्यांदा नागपूर दक्षिण-पश्चिमची जागा जिंकली. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुढे यांचा 58,942 मतांनी आणि 2019 मध्ये आशिष देशमुख यांचा 49,344 मतांनी पराभव केला होता.

चर्चेनुसार, आमदारांची संख्या पाहून मंत्रिपदांची विभागणी केली जाईल. भाजपला 22-24, शिवसेना (शिंदे गट) 10-12 आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) 8-10 मंत्री मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपती राजवट टाळण्यासाठी, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी 26 नोव्हेंबरपूर्वी नवीन सरकार स्थापन करणे आवश्यक आहे. फडणवीस यांच्या नियुक्तीची औपचारिक घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. याच आठवड्यात शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजिनामा

वसई-नालासोपारा : हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांचा पराभव

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा