गोरेगाव, अंधेरी आणि जोगेश्वरी भागात 'या'दिवशी पाणीपुरवठा होणार प्रभावित

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अहवालानुसार, मुंबईतील के वेस्ट वॉर्ड (अंधेरी-पश्चिम), के पूर्व (जोगेश्वरी) आणि पी दक्षिण (गोरेगाव) भागातील पाणीपुरवठा २४ ते २५ फेब्रुवारी रोजी प्रभावीत होईल. पाइपलाइन बदलण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे पाणीपुरवठा प्रभावित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

शिवाय, मुंबई पालिकेतर्फे ९०० मिमी आणि १२०० मिमी पाइपलाइनचे डायव्हर्शन करण्यात येणार आहे. हे काम २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता सुरू होईल आणि २५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४.३० पर्यंत सुरू राहिल. त्यामुळे ज्या परिसरात रात्री पाणी येत तिकडे २४ ला रात्री आणि ज्या परिसरात सकाळी पाणी येतं तिकडे २५ ला सकाळी पाणीनाही येणार.

के पश्चिम प्रभागाचे भाग एसव्ही रोड, अमृत नगर, गुलशन नगर, पी दक्षिण बिंबिसार नगर आणि के पूर्व मध्ये माजास, जोगेश्वरी रेल्वे स्टेशन आणि प्रेम नगर आहेत. त्यामुळे प्रशासनानं संबंधित भागातील नागरिकांना पुरेसे पाणीसाठवण्याची विनंती केली आहे.

यापूर्वी अंधेरी (पूर्व) इथं दोन मुख्य जलवाहिनी जोडण्याचं काम सुरू असल्यानं के / पश्चिम, के / पूर्व, एच / पश्चिम, एच/पूर्व प्रभागातील भागात २ ते ३ फेब्रुवारी दरम्यान पाणीपुरवठा खंडित झाला होता. शिवाय, चकाला इथं व्हॉल्व्ह बदलण्याचे काम चालू आहे. अंधेरी पश्चिम आणि पूर्वेसह वांद्रे पश्चिम आणि पूर्वेचे भागही बाधित आहेत.

दुसरीकडे, यापूर्वी पनवेल महानगरपालिकेनं भविष्यात कोणतीही मोठी तूट टाळण्यासाठी या भागातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेनं सर्व पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला होता. परिणामी, पीएमसीमधील सुमारे ६ हजार ३०० ग्राहक पाण्याची बचत करतील.


हेही वाचा

कोरोनामुळं महापालिकेतील 'इतक्या' अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मृत्यू

गेट वे ऑफ इंडिया’च्या परिसरात होणार बदल

पुढील बातमी
इतर बातम्या