आमच्यामुळे महिला खेळाडूंना चांगले दिवस - मिताली राज

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आपल्या संघातील खेळाडू आणि त्यांच्या कामगिरीवर चांगलीच खूश आहे. 'इंग्लडसोबत वर्ल्डकपमधील अंतिम सामन्यातील पराभवानंतर संघाला खूप काही शिकायला मिळालं. आमच्या खेळामुळे भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस येण्यास सुरुवात झाली' असल्याचे मिताली राजने बुधवरी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

2013 च्या वर्ल्डकपमध्ये झालेली निराशा महिला क्रिकेट संघाने मागे सोडून दिली. त्यावेळी भारतीय महिला क्रिकेट संघ सातव्या स्थानावर होता. माझ्या संघाने खूप मेहनत घेतली होती. त्याचा परिणाम आता दिसलाच असेल. बीसीसीआयने स्थानिक अंडर-16, 19 आणि 23 मधील खेळाडूंना मजबूत करण्यासाठी त्यांचे स्ट्रक्चर बदलण्याची गरज आहे.

मिताली राज, कर्णधार. भारतीय महिला क्रिकेट संघ

यावेळी वर्ल्डकपमध्ये 171 धावा करून चमकदार कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीत कौरचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले. आपण पहिल्यांदाच इतकी मोठी धावसंख्या उभारुन नाबाद राहिल्याचे मितालीने सांगितले.

आतापर्यंत घरगुती मैदानावर तसेच आतंरराष्ट्रीय पातळीवर अनेक सामने खेळले आहेत. पण एवढ्या जास्त धावा आपण पहिल्यांदाच केल्या आहेत, अशा शब्दांत तिने आपला आनंद व्यक्त केला. अंतिम सामन्यात इंग्लडला आपल्या वेगवान गोलंदाजीने नमवत वर्चस्व राखलेल्या झुलन गोस्वामीनेही आंनद व्यक्त केला. 

'लॉर्ड्स मैदानावर खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. मी देखील त्या मैदानावर काही वर्षांपूर्वी गेले होते. तेव्हा तिथलं गवत मी घेऊन आले होते. कारण नंतर त्या मैदानावर जाण्याची संधी मिळेल की नाही, हेच माहीत नव्हते. पण विश्वचषकाच्या निमित्ताने माझे ते स्वप्न पूर्ण झाले. अंतिम सामन्यात खूप दबाव होता. पण तरी आम्ही प्रयत्न सोडले नाहीत. सोबतच आम्ही एन्जॉय करत तो सामना खेळला', अशा शब्दांत झुलनने आपल्या भावना व्यक्त केल्या.


हेही वाचा -

भारतीय महिला क्रिकेट संघाने हृदय जिंकले - नीता अंबानी


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या