Advertisement

भारतीय महिला क्रिकेट संघाने हृदय जिंकले - नीता अंबानी


भारतीय महिला क्रिकेट संघाने हृदय जिंकले - नीता अंबानी
SHARES

विश्वचषक स्पर्धेच्या सर्व सामन्यांत विजयी कामगिरी केल्यानंतर अंतिम लढतीत भारतीय महिला क्रिकेट संघाला इंग्लंडकडून अवघ्या 9 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना जिंकला नसला तरी, देशातील कोट्यवधी लोकांचे मने मात्र भारतीय महिला क्रिकेट संघाने जिंकली, असे म्हणत नीता अंबानी यांनी महिला खेळाडूंचे कौतुक केले आहे. रविवारी झालेल्या इंडियन सुपर लीगच्या ड्राफ्टमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी आयएसएलच्या अनावरणादरम्यान त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

यावेळी इंडियन सुपर लीगमध्ये नव्याने समावेश झालेल्या जमशेदपूर एफसी आणि बंगळुरू एफसी या संघांचे स्वागत नीता अंबानी यांनी केले. यावेळी त्या बोलत होत्या. हे संघ अनुक्रमे टाटा स्टील आणि जे. एस. डब्लू हे प्रमोट करणार आहेत.

'भारतात फुटबॉलप्रेमींची संख्या वाढत आहे. फुटबॉलच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल)मुळे खेळाडूंना करियर घडवण्याची मोठी संधी मिळाली आहे. 'हिरो आयएसएल'ला मागील तीन वर्षात खूप प्रसिद्धी मिळाली आहे. आता भारत जगात फुटबॉलमध्ये 96 व्या क्रमांकावर आहे. 2015 मध्ये 173 क्रमांकावर होता. तसेच पहिल्या सीजनला 84 भारतीय खेळाडूंनी यात सहभाग घेतला होता. सीजन चारमध्ये एकूण 205 भारतीय खेळाडू होते, असेही नीता अंबानी यावेळी म्हणाल्या.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा