उच्च रक्तदाब ठरतोय सायलंट किलर! 'असा' आणा नियंत्रणात

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रक्तदाब हा विशिष्ट जीवनशैलीमुळे निर्माण झालेला आजार आहे. गेल्या काही वर्षांत त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. हा फक्त वयस्कर व्यक्तींचा आजार राहिला नसून त्यांची पाळेमुळे तरुण पिढीमध्ये रुजली आहेत.

उच्च रक्तदाब वेळीच नियंत्रणात आणला नाही तर अशा व्यक्तींना पुढे इतर दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या रोगाबद्दल वेळीच माहिती करून घेऊयात.

उच्च रक्तदाब म्हणजे काय?

  • आपलं हृदय धडधडतं, त्यावेळी रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून शरीरातील विविध अवयवांना रक्तपुरवठा होत असतो. रक्तवाहिन्यांमधून ज्या गतीनं रक्त वाहतं त्याला रक्तदाब म्हणतात.
  • सुदृढ व्यक्तीच्या शरीरातील रक्ताभिसरणाचा वेग १२०/८० असा असतो आणि १२०/८० ते १३९/८९ हा रक्ताभिसरणाचा वेग सामान्य समजला जातो.

अति रक्तदाबाची लक्षणं

  • सतत डोके दुखणे
  • जड वाटणं
  • चक्कर येणं
  • आसपासच्या वस्तू हलत असल्याचा भास होणे
  • कामात लक्ष केंद्रित न होणं
  • एकाग्रता न होणं
  • आकडेमोड चुकणे
  • घटनाक्रम विसरणे
  • थकवा जाणवणे
  • चिडचिड करणं
  • छातीत धडधड होणं

रक्तदाब फारच वाढला असेल तर खालील लक्षणे दिसून येऊ शकतात.

  • दृष्टिदोष
  • कमी दिसणं
  • नाकातून रक्तस्राव होणं
  • हातापायावर सूज येणं
  • कधी कधी मेंदूमध्ये रक्तस्राव होणं
  • किडनी निकामी होणं
  • हृदयविकाराचा झटका येणं

आदी त्रास होऊ शकतो.

उच्च रक्तदाबाची कारणं

  • ताण
  • आहार
  • आहारात मीठाचं अधिक सेवन
  • धूम्रपान आणि मद्यसेवन
  • लठ्ठपणा किंवा वाढलेलं वजन
  • शारीरिक हालचाली न करणं

उच्च रक्तदाबावर 'असं' मिळवा नियंत्रण

  • बोनलेस चिकन, मासे, रेड मीट, समुद्रातील मासे टाळणं हेच उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहे. आहारात ताजी फळ आणि भाज्यांचा समावेश वाढवणं अधिक फायदेशीर आहे.
  • नियमित चालणं किमान इतका व्यायाम केलात तरीही तुम्हांला अनेक आजारांचा धोक दूर ठेवायला मदत होईल.
  • उच्च रक्तदाबाचा त्रास वाढण्यामागे आहारातील सोडियमचे वाढते प्रमाण कारणीभूत ठरतं.
  • मद्यपान हे आरोग्याला अत्यंत धोकादायक आहे.

'ही' योगासनं फायदेशीर

  • सर्वांगासन
  • मत्स्यासन
  • उष्ट्रासन
  • बालसाना


हेही वाचा

‘म्युकरमायकोसीस’च्या रुग्णांसाठी ५ हजार इंजेक्शन उपलब्ध

Cyclone Tauktae : मुंबईतील ३ जंबो कोविड केंद्रातील एकूण ५८० रुग्णांचं स्थलांतर

पुढील बातमी
इतर बातम्या