Advertisement

cyclone Tauktae : मुंबईतील ३ जंबो कोविड केंद्रातील एकूण ५८० रुग्णांचं स्थलांतर

या पावसाची शक्यता लक्षात घेता मुंबई महापालिकेनं खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि मुलूंड येथील कोविड आरोग्य केंद्रांतील रुग्ण हलवण्यात आलं.

cyclone Tauktae : मुंबईतील ३ जंबो कोविड केंद्रातील एकूण ५८० रुग्णांचं स्थलांतर
SHARES

अरबी समुद्रात तौत्के चक्रीवादळ (cyclone Tauktae) घोंगावत आहे. या वादळामुळे मुंबईत वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज यापूर्वीच हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मात्र या पावसाची शक्यता लक्षात घेता मुंबई महापालिकेनं खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि मुलूंड येथील कोविड आरोग्य केंद्रांतील रुग्ण हलवण्यात आलं. या सर्व कोविड सेंटर्समधील (Covid centre) एकूण ५८० कोरोनाबाधित रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर केलं.

मुंबईचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत रुग्णांच्या स्थलांतरावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर वरील निर्णय घेण्यात आला. तौत्के चक्रीवादळामुळं मुंबईत ताशी सुमारे ६० ते ८० किलोमीटर वेगानं वादळीवारे वाहण्याची शक्यता आहे. तसा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. या काळात जोरदार पाऊससुद्धा पडू शकतो. चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून हे वादळ जात आहे.

या काळात वादळीवारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच कारणामुळे खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोविड रुग्णांना स्थलांतरित करण्यात आलं. प्रामुख्याने ३ जंबो कोविड आरोग्य केंद्रांतील मिळून एकूण ५८० रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये शरीवरी रात्रीच सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आलं.

तौत्के चक्रीवादळामुळे मुंबईतील ३ जंबो कोविड केअर सेंटरमधील एकूण ५८० रुग्ण हालवण्यात येणार आहेत.

  • दहिसर कोविड केंद्रातील १८३ रुग्ण
  • वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) कोविड केंद्रातील २४३ रुग्ण
  • मुलूंड कोविड केंद्रातील १५४ रुग्ण



हेही वाचा - 

‘तौत्के’ चक्रीवादळ; कोरोना रुग्णालयांतील ३९५ रुग्णांचे स्थलांतर

राज्यात ३४ हजार कोरोनाचे नवे रुग्ण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा