Advertisement

राज्यात ३४ हजार कोरोनाचे नवे रुग्ण

राज्यात रुग्णसंख्या घटत असली तरी मृत्यूचं प्रमाण मात्र कमी झालेलं नाही. शनिवारी ९६० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात ३४ हजार कोरोनाचे नवे रुग्ण
SHARES

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने खाली येत असल्याचं दिसून येत आहे. शनिवारी राज्यात ३४ हजार ८४८ नवीन रुग्ण आढळले. तर  ५९ हजार ७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचंही प्रमाण वेगाने वाढत असून हे प्रमाण ८९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

राज्यात रुग्णसंख्या घटत असली तरी मृत्यूचं प्रमाण मात्र कमी झालेलं नाही. शनिवारी  ९६० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील केरोना मृत्यूदर सध्या १.५१ टक्के एवढा आहे. 

मुंबईत शनिवारी १४४७ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर २३३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी २१३ दिवसांवर गेला आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के आहे. 

आजपर्यंत एकूण ४७ लाख ६७ हजार ५३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आजपर्यंत ३ कोटी ८ लाख ३९ हजार ४०४ करोना चाचण्या झाल्या आहेत.  एकूण नमुन्यांपैकी ५३ लाख ४४ हजार ६३ (१७.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३४ लाख ४७ हजार ६५३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर २८ हजार ७२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पाच लाखांच्या खाली आली आहे. सध्या राज्यात ४ लाख ९४ हजार ३२ रुग्ण उपचार घेत आहेत. सर्वाधिक ९३ हजार २४५ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात ३६ हजार ५६०, मुंबई पालिका क्षेत्रात ३४ हजार ८३, अहमदनगर जिल्ह्यात ३० हजार २२१ तर ठाणे जिल्ह्यात २९ हजार ६५४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा