बोरीवली इथल्या मागाठणे परिसरात असलेल्या ‘माता व बालक’ या पालिकेच्या रुग्णालयातील एक्स-रे विभाग एका महिन्यात सुरू करण्यात येईल, असा दावा रुग्णालयाकडून करण्यात आला होता. पण, एक महिना उलटून गेला तरी या रुग्णालयातील एक्स-रे विभाग बंदच असल्याचं समोर आलंय. त्यामुळे इथे प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांना एक्स-रे काढण्यासाठी शताब्दी किंवा आंबेडकर रुग्णालयात जावं लागतंय. दिवसाला जवळपास ओपीडीसाठी 50 ते 60 महिला रुग्णालयात येतात.
मागाठणेपासून शताब्दी रुग्णालयात येण्यासाठी 15 मिनिटे लागतात. त्यामुळे आमची मोठी दगदग होते, असं माता व बालक रुग्णालयातून शताब्दी रुग्णालयात एक्स-रे काढण्यासाठी आलेल्या महिलांनी सांगितलं. त्यामुळे लवकरात लवकर या रुग्णालयातील एक्स-रे विभाग सुरू करावा अशी मागणी देखील काही महिलांनी केलीय.
हेही वाचा - बोरिवलीत गरोदर महिलांची पायपीट, रुग्णालयात एक्स-रे मशीनच बंद