बोरिवलीत गरोदर महिलांची पायपीट, रुग्णालयात एक्स-रे मशीनच बंद

Borivali
बोरिवलीत गरोदर महिलांची पायपीट, रुग्णालयात एक्स-रे मशीनच बंद
बोरिवलीत गरोदर महिलांची पायपीट, रुग्णालयात एक्स-रे मशीनच बंद
बोरिवलीत गरोदर महिलांची पायपीट, रुग्णालयात एक्स-रे मशीनच बंद
बोरिवलीत गरोदर महिलांची पायपीट, रुग्णालयात एक्स-रे मशीनच बंद
बोरिवलीत गरोदर महिलांची पायपीट, रुग्णालयात एक्स-रे मशीनच बंद
See all
मुंबई  -  

बोरीवली इथल्या मागाठाणे परिसरातील ‘माता व बालक’ या पालिकेच्या रुग्णालयातील एक्स-रे विभाग गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे इथे प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांना एक्स-रे काढण्यासाठी शताब्दी किंवा आंबेडकर रुग्णालयात जावं लागत आहे. माता व बालक या रुग्णालयात फक्त प्रसुती केली जाते. त्यामुळे दिवसाला जवळपास ओपीडीसाठी 50 ते 60 महिला या रुग्णालयात येतात. याविषयी काही महिलांशी संवाद साधला असता त्यांनीही एक्स-रे विभाग बंद असल्याचं सांगितलं. तसंच शताब्दी रुग्णालयात एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या महिलांशी संवाद साधला असता माता व बालक रुग्णालयातूनच शताब्दी रुग्णालयात आल्याचं त्यांनी सांगितलं. 

मागाठणेपासून शताब्दी रुग्णालयात येण्यासाठी 15 मिनिटे लागतात. माता व बालक या रुग्णालयातील एक्स-रे विभाग बंद असल्याचं आम्हाला माहीत नाही. त्यामुळे एक्स-रे काढण्यासाठी इथून-तिथून पळापळ करावी लागते, अशी प्रतिक्रिया शताब्दी रुग्णालयात गेलेल्या एका महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलीय.


एक्स-रे विभागात टेक्निशियनच उपलब्ध नसल्याने दोन महिन्यांपासून हा कक्ष बंद आहे. टेक्निशियनची प्रकृती ठीक नसल्याने तो कामावर रुजू झालेला नाही आणि टेक्निशियनच्या जागेवर कोणत्याही व्यक्तीला लगेच कामाला ठेवता येत नाही. त्यामुळे हा विभाग बंद आहे. तो कामावर रुजू झाला की आधी त्याला तपासणीसाठी (Physical Fitness) पाठवलं जाईल आणि त्यातही जर टेक्निशियन ठिक नसेल तर त्याच्या जागी दुसऱ्या जाणकार व्यक्तीची नेमणूक करण्यात येईल. या सर्व प्रक्रियेला आणखी एक महिना लागेल. पण, लवकरात लवकर एक्स- रे विभागात व्यक्ती नेमू 

- अनिल चोपडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी


याविषयाची लवकरात लवकर चौकशी करू. गरोदर महिलांना एक्स-रे काढण्याची तेवढी गरज नसते. सोनोग्राफी केली जाते. त्यामुळे हे माता व बालक रुग्णालयातील डॉक्टर्स गरोदर महिलांना शताब्दी रुग्णालयात का पाठवतात? याची देखील लवकरच चौकशी करू 

- डॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी, महानगरपालिका

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.