अजित अागरकरची निवड समितीतून हकालपट्टी?

मुंबई सिनियर संघाचे निवड समिती अध्यक्ष अजित अागरकर अाणि अन्य तीन सदस्यांविरोधात दाखल केलेल्या अर्जाचा फैसला येत्या दोन ते तीन दिवसांत लागण्याची शक्यता अाहेपारसी जिमखान्याचे उपाध्यक्ष अाणि क्रिकेट सचिव खोदादार याझदेगर्दी यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रशासकीय समितीकडे निवड समितीच्या अकार्यक्षमतेबद्दल लेखी तक्रार केली असून निवड समितीच्या हकालपट्टीची मागणी केली अाहेयाझदेगर्दी यांनी एमसीएच्या ३०पेक्षा जास्त सदस्यांच्या सह्यांचे पत्र सुपूर्द केले असून एमसीएला याप्रकरणी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याची मागणी केली अाहेया अर्जावर २१ अाॅगस्ट रोजी फैसला होणार असला तरी येत्या २-३ दिवसांतच त्यावर निर्णय होण्याची शक्यता अाहे.

मुंबई क्रिकेटमधील नवे वाद

मुंबई रणजी संघासाठीच्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती जुलैपर्यंत लांबल्यानंतर अाता निवड समितीवरून नवा वाद उद्भवला अाहेगेल्या महिन्यात निवड समितीने सराव शिबिरासाठी खेळाडूंची निवड केलीपण त्यात गेल्या मोसमात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान दिले गेले नाही. निवड समितीच्या या कारभारावर अनेक माजी खेळाडूप्रशिक्षक तसेच क्लब सदस्यांनी नाराजी व्यक्त करून प्रशासकीय समितीकडे निवड समिती बरखास्त करण्याची मागणी केली अाहे.

अागरकरने सोडले मौन

अखेर याप्रकरणी अजित अागरकरने मौन सोडलेखेळाडूंची वागणूक अाणि त्यांचा बेशिस्तपणा पाहून अाम्ही काही खेळाडूंना सराव शिबिरातून वगळलेकामगिरीबरोबरच तुमची वृत्ती अाणि शिस्तीला किती महत्त्व अाहेहा संदेश युवा खेळाडूंपर्यंत पोहोचवणे ही अामची इच्छा होतीगेल्या मोसमात खेळाडूंमध्ये वागणूकवृत्ती अाणि शिस्तीचा अभाव असल्याचे जाणवले होतेम्हणूनच अाम्ही हा निर्णय घेतलाअसे अागरकरने सांगितले.


हेही वाचा -

अखेर एमसीएने दिला 'त्या’ खेळाडूंना न्याय

मुंबईची निवड समिती खेळाडूंच्या करिअरशी खेळतेय – दिलीप वेंगसरकर


पुढील बातमी
इतर बातम्या