SHARE

मुंबई रणजी संघाच्या अागामी मोसमासाठीच्या सराव शिबिरासाठी माजी क्रिकेटपटू अजित अागरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीने चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना डावलले होते. पारसी जिमखान्याचे उपाध्यक्ष अाणि क्रिकेट सचिव खोदादाद याझदेगर्डी यांनी याप्रकरणी अावाज उठवत निवड समिती बरखास्त करण्याची मागणी केली होती. मात्र त्यांच्या सूचनांचा विचार करून मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) अखेर या खेळाडूंना न्याय देत त्यांची वांद्रे-कुर्ला संकुलात सुरू असलेल्या सराव शिबिरासाठी निवड केली अाहे.


या खेळाडूंची निवड

गेल्या हंगामात चांगली कामगिरी करूनही मुंबईच्या सिनियर संघात स्थान न मिळवू शकलेल्या शुभम रांजणे, शशांक सिंग, अंकित सोनी, परिक्षित वळसंगीकर, प्रसाद पवार अाणि अादित्य धुमाळ या सात खेळाडूंची निवड अागामी मोसमासाठीच्या सराव शिबिरासाठी करण्यात अाली अाहे. गेल्या अाठवड्यातच त्यांच्या निवडीविषयीचा निर्णय झाल्याचे समजते.


निवड समिती अकार्यक्षम

खोदादार याझदेगर्डी यांनी गेल्या अाठवड्यातच एमसीएवर मुंबई हायकोर्टानं नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीची भेट निवड समितीच्या कामकाजावर ताशेरे अोढले होते. निवड समिती स्थानिक सामन्यांनाच हजर राहत नसल्यामुळे त्यांनी सराव शिबिरासाठी पात्र असलेल्या खेळाडूंना निवडले नाही, असा अारोपही त्यांनी केला. निवड समिती बरखास्त करण्याकरिता विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यासाठी याझदेगर्डी यांनी ३९ सदस्यांच्या सह्यांचं निवेदन प्रशासकीय समितीला दिलं अाहे.


अाम्ही सराव शिबिरासाठी काही नव्या खेळाडूंचा समावेश केला अाहे. डोमेस्टिक वेळापत्रक लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात अाली अाहे. त्यासाठी खेळाडू सज्ज व्हावेत, यासाठी अाम्ही हा निर्णय घेतला अाहे. सुरुवातीपासूनच अामची तशी योजना होती. पण संघाच्या गरजेनुसार अाम्ही खेळाडूंची निवड करणार अाहोत.
- अजित अागरकर, एमसीएच्या निवड समितीचे अध्यक्ष


हेही वाचा -

सर्फराझ खानला करायचीय मुंबई संघात घरवापसी

विनायक सामंत बनला मुंबईचा प्रशिक्षक!

रमेश पोवारवर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या हंगामी प्रशिक्षकाची जबाबदारीसंबंधित विषय
ताज्या बातम्या