Advertisement

विनायक सामंत बनला मुंबईचा प्रशिक्षक!


विनायक सामंत बनला मुंबईचा प्रशिक्षक!
SHARES

मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी विनायक सामंत की रमेश पोवारची वर्णी लागणार, अशी चर्चा गेले काही दिवस मुंबई क्रिकेटवर्तुळात रंगली होती. सामंतपेक्षा पोवारचे पारडे जड असतानाच मुंबई क्रिकेट असोसिएशनवर केलेली टीका रमेश पोवारला भोवली असून अाता मुंबईच्या प्रशिक्षकपदी विनायक सामंतची निवड करण्यात अाली अाहे. त्याचबरोबर मुंबईच्या १९ वर्षांखालील संघासाठी एमसीएच्या क्रिकेट सुधार समितीने (सीअायसी) विल्किन मोटा याची निवड केली अाहे. याबाबतची अधिकृत घोषणा एमसीएने अापल्या ट्विटर पेजवर केली अाहे.


पोवारला एमसीएवरील टीका भोवली

एमसीएच्या क्रिकेट सुधार समितीने रमेश पोवारची नियुक्ती करण्याचे ठरवले होते. पण काही महिन्यांपूर्वी वांद्रे-कुर्ला संकुलातील एमसीए सेंटरच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर रमेश पोवारने एमसीएवर ताशेरे अोढले होते. हीच टीका पोवारला भोवली अाहे. या टीकेमुळे पोवारचे मुंबईचा प्रशिक्षक होण्याचे स्वप्नही भंगले अाहे.


 


विनायक सामंतची कारकीर्द

यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून २००२ साली विनायक सामंतने मुंबई संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २०१० मध्ये त्याने अापल्या कारकीर्दीचा समारोप केला. विनायकने मुंबईकडून ६९ प्रथम श्रेणी सामन्यांत प्रतिनिधित्व करताना २६.१० च्या सरासरीने २०१० धावा फटकावल्या. त्याचबरोबर त्याने २२५ झेल अाणि २९ स्टपिंगही केले. पाच वेळा मुंबईला रणजी विजेतेपद पटकावून देण्यात त्याने मोलाची कामगिरी बजावली होती. त्यानंतर त्याने अासाम अाणि त्रिपूरा संघाचेही प्रतिनिधित्व केले होते. ४५ वर्षीय विनायकने मुंबईच्या २३ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले अाहे.


अाठ जणांमधून विल्किन मोटाची निवड

मुंबईबाहेरचा प्रशिक्षक न नेमण्याचा एमसीएचा इतिहास असून यावर्षीही मुंबईच्याच दोघांची प्रशिक्षकपदी निवड करण्यात अाली अाहे. मुंबईच्या १९ वर्षांखालील संघासाठी अाठ उमेदवारांचे अर्ज एमसीएकडे अाले होते. त्यातून मुंबईचा माजी अष्टपैलू खेळाडू विल्किन मोटा याची युवा संघासाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात अाली अाहे.


हेही वाचा -

रमेश पोवारलाही व्हायचंय मुंबईचा प्रशिक्षक!

मुंबईच्या प्रशिक्षकांची निवड लांबणीवर?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा