SHARE

मुंबईचा प्रशिक्षक ६ जुलै रोजी निवडला जाणार, अशी घोषणा मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) काही दिवसांपूर्वी केली होती. पण अाता मुंबई संघासाठीचा सिनियर प्रशिक्षक, फिजियोथेरपिस्ट, ट्रेनर अाणि १९ वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकाची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली अाहे. एमसीएची क्रिकेट सुधार समिती (सीअायसी) या सर्वांची निवड करणार असून एमसीएचा कारभार पाहणाऱ्या प्रशासकीय समितीने सीअायसीला गुरुवारी याबाबत अधिकृतपणे कळवले अाहे. त्यामुळे प्रशिक्षक निवडीला उशीर होण्याची शक्यता अाहे.एकाच दिवशी सर्वांच्या मुलाखती घेणे अशक्य

रणजी संघासाठीच्या सहा उमेदवारांनी अर्ज केला असून त्यात भारताचा माजी कसोटीपटू रमेश पोवार, भारताचा माजी यष्टीरक्षक अजय रात्रा, मुंबईचा माजी यष्टीरक्षक विनायक सामंत, विदर्भचा माजी अाॅफस्पिनर प्रितम गंधे, महाराष्ट्राचा माजी खेळाडू नंदन फडणीस अाणि मुंबईचे ज्युनियर प्रशिक्षक विनोद राघवन यांचा समावेश अाहे. त्याचबरोबर १९ वर्षांखालील प्रशिक्षकपदासाठी अाठ जण शर्यतीत अाहेत. या सर्वांच्या मुलाखती एकाच दिवसात घेणे सीअायसीला शक्य होणार नाही.


सीअायसीची बैठक ठरल्यानुसारच

सात सदस्यांचा समावेश असलेली सीअायसीची बैठक पूर्वनियोजित होणार अाहे. बलविंदर सिंग संधू, राजू कुलकर्णी, अमोल मुझुमदार, करसन घावरी, अजित वाडेकर अाणि किरण मोकाशी हे सर्व सदस्य शुक्रवारी भेटणार असून ते उमेदवारांच्या मुलाखती घेतील.


फिजियो, ट्रेनरची निवड होणार?

क्रिकेट सुधार समिती फिजियोथेरपिस्ट अाणि ट्रेनर यांची निवड शुक्रवारीच करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार अाहे. अजित अागरकर यांच्या अध्यखतेखालील मुंबईच्या निवड समितीने रणजी करंडकासाठी अाणि २३ वर्षांखालील फिटनेस कॅम्पसाठी खेळाडूंची निवड केली अाहे. हे शिबिर प्रत्येक वर्षी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात सुरू होतं. पण ट्रेनरअभावी हे शिबिर पुढे ढकलण्यात अालं अाहे.


हेही वाचा -

मुंबईच्या प्रशिक्षकाचा फैसला शुक्रवारी

मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी रमेश पोवारने केला अर्ज!संबंधित विषय
ताज्या बातम्या