Advertisement

मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी रमेश पोवारने केला अर्ज!


मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी रमेश पोवारने केला अर्ज!
SHARES

माजी क्रिकेटपटू समीर दिघे यांनी मुंबईच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबईच्या प्रशिक्षकाचा शोध घेण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) पहिल्यांदाच अाॅनलाइन अर्ज मागवले होते. अापल्यालाही मुंबईचा प्रशिक्षक व्हायचंय, असं सांगणारा भारताचा माजी अाॅफस्पिनर रमेश पोवार याने मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याचे समजते. रमेश पोवारने याअाधी एमसीएच्या इनडोअर क्रिकेट अकॅडमीत फिरकी प्रशिक्षक म्हणून भूमिका निभावली होती.


कुरुविला, प्रवीण अमरेंची माघार

मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील एक गट भारताचा माजी वेगवान गोलंदाज अॅबी कुरुविला याला प्रशिक्षक बनविण्यासाठी उत्सुक होता. मात्र अॅबी कुरुविला अाणि भारताचे माजी क्रिकेटपटू व मुंबईचे माजी प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला नसल्याचे समजते.


अशी होईल निवड

मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची मंगळवार ही अंतिम तारीख होती. अाता एमसीए अर्ज अालेल्या उमेदवारांची छाननी करणार असून त्यांना मुलाखत अाणि सादरीकरण करण्यासाठी बोलावणार अाहे. ही प्रक्रिया ६ जुलै रोजी होईल. एमसीएच्या क्रिकेट सुधार समितीसमोर त्यांना सादरीकरणाला तसेच मुलाखतीला सामोरे जावे लागणार अाहे. त्यानंतर १५ जुलै ते ३१ मार्च या कालावधीसाठी मुंबईचा सिनियर संघ अाणि १९ वर्षांखालील संघासाठी दोन्ही प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाईल.


हेही वाचा -

रमेश पोवारलाही व्हायचंय मुंबईचा प्रशिक्षक!

मुंबईच्या प्रशिक्षकाचा फैसला शुक्रवारी



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा