Advertisement

मुंबईच्या प्रशिक्षकाचा फैसला शुक्रवारी


मुंबईच्या प्रशिक्षकाचा फैसला शुक्रवारी
SHARES

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासात पहिल्यांदाच सिनियर संघाच्या अाणि १९ वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदासाठी वेबसाईटवरून अर्ज मागवण्यात अाले अाहेत. मंगळवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत mcacrik@mumbaicricket.com या संकेतस्थळावर अर्ज करायवाचे असून शुक्रवारी मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड केली जाणार अाहे. एमसीएच्या क्रिकेट सुधार समितीची (सीअायसी) बैठक ६ जुलै रोजी होणार असून त्यावेळीच नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली जाईल.


असे असतील निकष

मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा माजी कसोटीपटू किंवा रणजीपटू असावा. त्याला प्रशिक्षणाचा अनुभव असावा. त्याचबरोबर संघ सांभाळण्याचे अाणि व्यवस्थापनाशी जुळवून घेण्याचे कसब त्याच्याकडे असायला हवे. प्रशिक्षकाची निवड झाल्यानंतर त्याच्याशी १५ जुलै ते ३१ मार्चपर्यंत करार करण्यात येईल.


हे शर्यतीत

समीर दिघे यांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अातापर्यंत अॅबी कुरुविला अाणि रमेश पोवार या माजी क्रिकेटपटूंनीच रस दाखवला अाहे. मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक अोमकार साळवी याला प्रशिक्षक बनवावे, अशी शिफारस मुंबईच्या अव्वल खेळाडूंनीच केली अाहे. त्याचबरोबर सुलक्षण कुलकर्णी, चंद्रकांत पंडित अाणि प्रवीण अमरे हेसुद्धा या शर्यतीत असल्याचे समजते.


हे निवडतील प्रशिक्षक

क्रिकेट सुधार समिती मुंबईच्या प्रशिक्षकाची निवड करणार असून या समितीत मुंबईतील दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश अाहे. नव्याने स्थापन झालेल्या या समितीत बलविंदर सिंग संधू, करसन घावरी, राजू कुलकर्णी, साहिल कुकरेजा, अमोल मुझुमदार यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश अाहे. भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर हेसुद्धा या समितीत अाहेत. मात्र तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी अद्याप अापला होकार कळवलेला नाही.


हेही वाचा -

अॅबी कुरुविलाही मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी रिंगणात

रमेश पोवारलाही व्हायचंय मुंबईचा प्रशिक्षक!

समीर दिघेंचा मुंबईच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा