Advertisement

समीर दिघेंचा मुंबईच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा


समीर दिघेंचा मुंबईच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा
SHARES

भारताचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज समीर दिघे यांनी मुंबई रणजी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिली अाहे. वैयक्तिक कारण सांगत समीर दिघे यांनी एका मोसमानंतरच राजीनामा दिला असला तरी अाता ४१वेळा रणजी करंडक जिंकणाऱ्या मुंबई संघाला अाता नव्या प्रशिक्षकाचा शोध घ्यावा लागणार अाहे.


दिघे यांची प्रशिक्षकपदाची कारकीर्द

४९ वर्षीय समीर दिघे यांनी चंद्रकांत पंडित यांच्याकडून मुंबईच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. मात्र समीर दिघे यांच्या प्रशिक्षकपदाच्या काळात मुंबईला गेल्या मोसमात रणजी करंडक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत कर्नाकटमधून हार पत्करावी लागली. विजय हजारे अाणि सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतही मुंबईला विजेतेपद पटकावता अाले नाही.का सोडलं दिघेंनी प्रशिक्षकपद?

मुंबई संघाची कामगिरी चांगली झाली नसल्यामुळे दिघे यांनी यापुढे प्रशिक्षकाची धुरा स्वीकारण्यास नकार दिला. त्यांना निर्णय घेण्यासाठी तीन-चार दिवसांचा कालावधी देण्यात अाला होता, मात्र त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. दिघे यांनी २००१ ते २००२ दरम्यान सहा कसोटी अाणि २३ वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले अाहे.


दिघे यांचा करार हा एका वर्षाचा होता, तो संपुष्टात अाला अाहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) त्यांना यापुढेही मुंबईचे प्रशिक्षकपद भूषवाल का, असे विचारले असता त्यांनी कौटुंबिक कारणास्तव प्रशिक्षकपद पुढे स्वीकारण्यास नकार दिला. अाता एमसीएला नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती करावी लागेल.
- एमसीएचे पदाधिकारी


हेही वाचा -

मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी आमरे, दिघे यांची फिल्डींग

अवघ्या १९ वर्षांचा पृथ्वी झाला कोट्यधीश, दिल्ली डेअरडेव्हिल्सची १.२ कोटींची बोली

संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा