मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी आमरे, दिघे यांची फिल्डींग

  Mumbai
  मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी आमरे, दिघे यांची फिल्डींग
  मुंबई  -  

  मुंबई रणजी संघाचे सध्याचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांचा करार लवकरच संपत आहे. त्यांच्या कराराचे नूतनीकरण होण्याची शक्यता कमी असल्याने मुंबई रणजी संघाला नव्या प्रशिक्षकाची गरज भासणार आहे. प्रशिक्षकपदाचा चांगला अनुभव गाठीशी असणारे प्रविण आमरे आणि समीर दिघे हे दोघेही या पदासाठी इच्छुक असल्याचे कळते.

  मुंबई क्रिकेट संघाच्या सुधार समितीच्या बैठकीत पंडित यांच्या कराराचे नूतनीकरण होण्याची शक्यता कमीच असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे भारताचे माजी क्रिकेटपटू प्रविण आमरे आणि समीर दिघे मुंबई संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत सहभागी झाले आहेत.

  चंद्रकांत पंडित मागील दोन वर्षांपासून मुंबई संघाचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने घवघवीत यश मिळवलेले आहे. प्रविण आमरे यांना प्रशिक्षकपदाचा तगडा अनुभव असून ते 'एमसीए'च्या प्रबंध समितीचे सदस्यही आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.