इंडियन क्रिकेट टीममध्ये नवीन सदस्य दाखल झाल्याचं तुम्हाला माहीत आहे का? नसेल, तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय)च्या वेबसाईटवर जाऊन नक्की बघा. बीसीसीआयने या नव्या सदस्याची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही दिली आहे.
टीम इंडियातील हा नवा पाहुणा कुठला खेळाडू नाहीय, तर नवीन मशीन आहे. फिल्डिंग ड्रील मशीन असं त्याचं नाव आहे. हे मशीन टीम इंडियाच्या प्रॅक्टिसकरीता घेण्यात आलं आहे. हे मशीन बाॅलिंग मशीनपेक्षा थोडसं लहान असून या मशीनमधून त्यंत वेगाने बाॅल फेकण्यात येतो.
टीम इंडियाचे फिल्डिंग कोच आर. श्रीधर यांना ही मशीन मदतगार ठरणार आहे. बीसीसीआयने आपल्या टि्वटर हँडलवर टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशनचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटासोबत 'भेटा भारताच्या नव्या टीममेटशी! हा नवा भिडू टीम इंडियाला फिल्डिंगमध्ये मदत करणार आहे,' असं टि्टवटही बीसीसीआयने केलं आहे. या फोटोत पृथ्वी शॉ आणि कर्णधार विराट कोहली स्लीप कॅचची प्रॅक्टिस करताना दिसत आहेत.
हेही वाचा-
अटीतटीच्या लढतीत यू मुम्बाची सरशी!
वेस्ट इंडिजविरूद्धची मुंबई वन डे संकटात!