Advertisement

अटीतटीच्या लढतीत यू मुम्बाची सरशी!


अटीतटीच्या लढतीत यू मुम्बाची सरशी!
SHARES

'प्रो कबड्डी लिग'च्या सहाव्या सीझनच्या सातव्या मॅचमध्ये यू मुम्बाने जयपूर पिंक पँथर्सला ३९-३२ अशी मात देत आपला पहिला विजय नोंदवला. अतिशय रोमांचक झालेल्या या मॅचमध्ये सिद्धार्थ देसाईने मिळवलेल्या १३ अंकांच्या जोरावर यू मुम्बाने हा विजय मिळवला. याआधी यू मुम्बाची पुणेरी पटलनसोबतची पहिली मॅच टाय (३२-३२) झाली होती.


हाफ टाइमपर्यंत पिछाडीवर

झोन 'ए' मधील ही मॅच चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये खेळवण्यात आली. मॅचमध्ये यू मुम्बाची टीम हाफ टाइमपर्यंत १३-१५ अशी पिछाडीवर होती. एवढंच नव्हे, तर सेकंड हाफमध्येही जयपूरने यू मुम्बवर दडपण आणलं होतं. परंतु अखेरच्या क्षणांमध्ये यू मुम्बाने उत्तम खेळाचं प्रदर्शन करत जयपूरला हरवलं.


जबरदस्त खेळ

यू मुम्बाकडून सर्वाधिक रेड पाईंट सिद्धार्थ देसाईने मिळवले. सिद्धार्थने या सीझनमधील आपला दुसरा सुपर-१० मिळवताना टीमला जिंकवून दिलं. सिद्धार्थने टाकलेल्या १७ रेडमध्ये १३ पाईंट मिळवले. याशिवाय टीमचा कॅप्टन फजल अत्राचली ने ५ रेडमध्ये ३ टॅकल पाईंट मिळवून मॅचमधील सर्वोत्कृष्ट डिफेंडरचा मान मिळवला. यू मुम्बाने रेडमधून २२, टॅकलमधून १०, आॅल आऊटमधून ४ आणि ३ अतिरिक्त पाईंट मिळवले.

तर, जयपूरच्या नितीन रावलने ८, अनुप कुमारने ४, मोहीत छिल्लरने ३ आणि संदीप धूलने ३ पाईंट मिळवले. जयपूरच्या टीमला रेडमधून १४, टॅकलमधून १०, आॅल आऊटमधून २ आणि ६ अतिरिक्त पाईंट मिळवले.हेही वाचा-

वेस्ट इंडिजविरूद्धची मुंबई वन डे संकटात!

पीबीएल लिलाव : सायना, सिंधू, श्रीकांतची ८० लाखांत खरेदीRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा