Advertisement

पीबीएल लिलाव : सायना, सिंधू, श्रीकांतची ८० लाखांत खरेदी


पीबीएल लिलाव : सायना, सिंधू,  श्रीकांतची ८० लाखांत खरेदी
SHARES

आगामी प्रीमियर बॅडमिंटन लीग (पीबीएल) साठी खेळाडूंचा लिलाव सोमवारी पार पाडला. या लिलावात भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, के. श्रीकांत आणि एच.एस. प्रणॉय यांना प्रत्येकी ८० लाख रुपयांची बोली लागली अाहे. विशेष म्हणजे सायनाला लिलावाच्या पहिल्या फेरीत बोली लावण्यात अाली नव्हती. मात्र भाग्यवान सोडतीनंतर सायनाला सन्मानित करण्यात अाले. कारण यावेळी बोली अधिकतम ८० लाख रुपयांपर्यंत पोचली होती.


सिंधू हैदराबाद हंटरकडे

भाग्यवान सोडतीद्वारे पी.व्ही. सिंधू हैदराबाद हंटरकडे, के. श्रीकांत बंगळुरू रॅपटर्स अाणि एच.एस. प्रणॉय दिल्ली डॅशर्स या संघाकडे गेले अाहेत. तर कॅरोलिना मॅरिनला पुणे एसेसने खरेदी केलं अाहे. याशिवाय विक्टर एक्सेलसनला अहमदाबाद स्मॅश मास्टर्सने ८० लाख रुपयांमध्ये तर वान हो ला ७० लाख रुपयांमध्ये अवध वाॅरियर्सने खरेदी केले.


सुइगार्टोला ७० लाखांची बोली

दुहेरीमधील भारताचा युवा खेळाडू सतविकसराज रॅकरेड्डीला अहमदाबाद स्मॅश मास्टर्सने ५२ लाख रुपयांची बोली लावली.  क्रिस एडकॉक अाणि गॅबी एडकॉक हे दोघे चेन्नई स्मॅशर्ससाठी एकत्र खेळणार अाहेत. या दोघांना एकत्रितपणे ९० लाख रुपयांना खरेदी करण्यात अाले अाहे. याशिवाय माथीस बो ला तापसी पन्नूची मालकी असलेल्या पुणे ७ एसेसने ५० लाखांमध्ये खरेदी केलं अाहे. तर दुसरीकडे जागतिक रॅँकिंगमध्ये ११ व्या स्थानावर असलेल्या टॉमी सुइगार्टोला दिल्ली डॅशर्सकडून ७० लाख रुपयांची बोली लावून विकत घेण्यात अाले. जागतिक रॅँकिंगमधील २५ व्या स्थानावरील ली ह्यूनला  हैदराबाद हंटरने ६० लाखांना तर डेन्मार्कच्या अँडर्स अॅन्टाॅनसनला मुंबई राॅकेट्सने ५०० लाख रुपयांना खरेदी केले. 






Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा