चार मुंबईकरांची भारत अ क्रिकेट संघात निवड

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) न्यूझीलंड अ विरुद्धच्या ५ वन डे सामन्यासाठी दोन स्वतंत्र भारत अ संघ निवडले आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या चार मुंबईकरांचा समावेश आहे. ही वन डे मालिका भारतात होणार आहे.

पहिल्या तीन वनडेसाठी मुंबईकर श्रेयस अय्यरची भारताच्या अ संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तर दुलीप ट्रॉफीतील पदार्पणात शतक ठोकणाऱ्या पृथ्वी शॉची देखील भारतीय अ संघात निवड झाली आहे. त्याचसोबत दुसऱ्या संघात धवल कुलकर्णी आणि शार्दूल ठाकूरला देखील संधी देण्यात आली आहे.

पहिल्या तीन 'वन डे'साठी संघ

पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर (कर्णधार), सिद्धार्थ कौल, शाहबाज नदीम, शुबमन गील, श्रीवत्स गोस्वामी (यष्टिरक्षक), करण शर्मा, बासील थम्पी, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, दीपक हुडा, मोहम्मद सीराज, मयांक अग्रवाल.

उर्वरीत दोन 'वन डे'साठी संघ

ए. आर. इस्वरन, रिषभ पंत (कर्णधार, यष्टिरक्षक), अंकित बावणे, बासील थम्पी, बाबा अपराजित, प्रशांत चोप्रा, शाहबाज नदीम, करण शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, सिद्धार्थ कौल, विजय शंकर, शुबमन गील.

'वन डे' मालिकेचे वेळपत्रक

  • ६ ऑक्टोबर- पहिली वन डे
  • ८ ऑक्टोबर- दुसरी वन डे
  • १० ऑक्टोबर- तीसरी वन डे
  • १३ ऑक्टोबर- चौथी वन डे
  • १५ ऑक्टोबर- पाचवी वन डे


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या