Advertisement

मुंबईकर पृथ्वी शॉचे दुलीप ट्राॅफीत पदार्पणातच शतक, सचिनच्या रेकाॅर्डशी बरोबरी


मुंबईकर पृथ्वी शॉचे दुलीप ट्राॅफीत पदार्पणातच शतक, सचिनच्या रेकाॅर्डशी बरोबरी
SHARES

लखनऊ येथे सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत इंडिया रेड संघाकडून खेळताना १७ वर्षांच्या मुंबईकर पृथ्वी शॉने पदार्पणातच शतक ठोकून मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची बरोबरी साधली आहे. एवढेच नाही, तरी दुलीप ट्रॉफीच्या अतिंम सामन्यात शतक करणारा पृथ्वी हा पहिलाच तरुण खेळाडू ठरला आहे.

पृथ्वीने रणजी स्पर्धेतही शतक ठोकत दणक्यात पदार्पण केले होते. त्याचीच पुनरावृत्ती त्याने दुलीप ट्राॅफित केली. पृथ्वीने हे शतक इंडिया ब्ल्युविरोधात सुरू असलेल्या अंतिम सामन्याच्या पहिल्याच दिवशी झळकावले.

इंडिया रेड संघाचा कर्णधार दिनेश कार्तिकने टॉस जिंकून पहिली फलंदाजी घेतली. पृथ्वीने सलामीला फलंदाजीस येत अखिल हेरवाडकर सोबत ७४ धावांची भागीदारी केली. अखिल २५ धावांवर 'रनआऊट' झाल्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीस उतरला. पण सूर्यकुमार अवघ्या ८ धावा करून माघारी परतल्याने कर्णधार दिनेश कार्तिक मैदानात उतरला. त्यानंतर पृथ्वीने दिनेशसोबत भागीदारी रचत आपले शतक पूर्ण केले. पृथ्वी १५४ धावांवर तर दिनेश १११ धावा करून तंबूत परतले.

या आधी देखील पृथ्वीने इग्लंड दौऱ्यावरील यूथ वनडेत शानदार खेळ केला होता. तर यूथ टेस्ट सामन्यात त्याने तीन अर्धशतके नोंदवली. त्याच्या कामगिरीकडे पाहता भारतीय संघात आणखी एका मुंबईकर क्रिकेटपटूचा समावेश होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.


हेही वाचा -

रोहित शर्माचा नवा विक्रम

अजिंक्य रहाणेला पंतप्रधान मोदींचे निमंत्रण

 


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा