Advertisement

रोहित शर्माचा नवा विक्रम


रोहित शर्माचा नवा विक्रम
SHARES

इंदोरच्या होळकर मैदानात रविवारी झालेल्या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम रोहित शर्माने मोडीत काढला आहे. रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जास्त षटकार करण्याचा सचिनचा विक्रम मोडीत काढला आहे. रोहितने 62 षटकार करत हा विक्रम केला आहे. याआधी भारताकडून सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकूण 60 षटकार रचल्याचा विक्रम केला होता. पण आता भारताकडून रोहितने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आता न्युझीलंडचा ब्रॅण्डन मॅक्युलम 61 षटकार करत दुसऱ्या स्थानावर, तर सचिन तेंडुलकर 60 षटकार करत तिसऱ्या स्थानावर आहे.


मुंबईकर जोडीचा शानदार खेळ

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 294 धावांचे लक्ष्य गाठून टीम इंडिया मैदानात उतरली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकर जोडीने शानदार असा खेळ केला. अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 139 धावांची भागीदारी झाली. यावेळी रोहितने दमदार अशी फलंदाजी करताना 62 चेंडूत 6 चौकार, 4 षटकार करत एकूण 71 धावांचा पल्ला गाठला. पण नेथिन कुलटर-नाईलच्या गोलंदाजीत तो बाद झाला. तर अजिंक्य रहाणेने 76 चेंडूत 70 धावा केल्या.


आयसीसी क्रमवारीत भारत अव्वल 

ऑस्ट्रेलिया विरुद्ध चालू असलेल्या पाच वन-डे सामन्यात टीम इंडियाने सलग तिसरा सामाना जिंकून हॅट्रिक केली आहे. 5 विकेट्सने हा सामना भारताने जिंकत विजय मिळवला आहे. आयसीसी क्रमवारीत भारत आधी दुसऱ्यास्थानी होता, तर पाहिल्या स्थानावर आफ्रिका संघ होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा सामना जिंकत आफ्रिका संघाला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे.


हेही वाचा - 

नॅशनल क्रिकेट क्लबला विजेतेपद

अजून एका मुंबईकराचा भारतीय क्रिकेट संघात समावेश


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा