Advertisement

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक 10 नोव्हेंबरला


मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक 10 नोव्हेंबरला
SHARES

येत्या 10 नोव्हेंबरला मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या विविध पदासाठी द्वैवार्षिक निवडणूक होणार आहे. एमसीएच्या व्यवस्थापकीय समितीची बैठक शुक्रवारी मुंबईत पार पडल्यानंतर याचा निर्णय घेण्यात आला. 

2015 साली मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुका पार पडला होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांची एमसीएच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. लोढा समितीच्या नियमानुसार 70 वर्षांवरील कोणताही व्यक्ती या पदावर राहू शकत नसल्यामुळे या जागी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची वर्णी लागली होती. 

या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार घेण्यात येतील. एमसीएकडून आता लवकरच मुंबई प्रिमियर लीग स्पर्धा देखील आयोजित करण्यात येणार आहे. व्यवस्थापकीय समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर जानेवारीत या स्पर्धा घेण्यात येतील. मुंबईला स्थानिक व्यासपीठ मिळावे म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती एमसीएकडून देण्यात आली.


हेही वाचा - 

अजित आगरकर यांची नवी इनिंग, एमसीएच्या निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती

शरद पवार यांचा एमसीएचा राजीनामा


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा