अजित आगरकर यांची नवी इनिंग, एमसीएच्या निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती

 Mumbai
अजित आगरकर यांची नवी इनिंग, एमसीएच्या निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती
Mumbai  -  

भारताचा माजी फास्ट बॉलर अजित आगरकर यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सिनियर आणि २३ वर्षांखालील वयोगटासाठीच्या निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्यासोबत या निवड समितीमध्ये निलेश कुलकर्णी, सुनील मोरे आणि जतीन परांजपे यांचा समावेश असेल. तर मुंबईच्या १९ वर्षांखालील वयोगटासाठीच्या निवड समिती अध्यक्षपदी राजेश पवार आणि अतुल रानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आपल्या १० वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये अजित आगरकर यांनी भारतीय क्रिकेट संघाकडून तब्बल १९१ वनडे आणि २६ टेस्ट मॅच खेळल्या. टेस्टमध्ये त्यांच्या नावावर एकूण ५८ विकेट्स असून वनडेमध्ये त्यांनी १९१ मॅचेसमध्ये २८८ विकेट्स घेतल्या. बॅट्समन म्हणूनही अजित आगरकर यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी मोलाची कामगिरी बजावली असून त्यांच्या नावावर वनडेमध्ये १२६९ तर टेस्टमध्ये ५७१ रन्स जमा आहेत.

Loading Comments